पुस्तकमैत्री


 
वाचन हाही आहाराच !

वाचन हे मला अन्न खाण्यासारखेच वाटते. ती आवड असतेही आणि नसतेही. 

गरज असतेच, पण ते निसत्व असेल तर निरुपयोगी होते. वाचन वाढीला पोषक हवे असेल, तर चौफेर हवे... कथा, कविता, कादंबरी, माहितीपर, मनोरंजन ......खूप यादी होईल...

याचमुळे कोणत्याही पठडीत न अडकता, मी मिळेल ते, कधीतरी शोधून, मिळवून वाचत राहते.. 

नाही आवडल तर बिनधास्त मधेच सोडूनही देते.... 

थोडक्यात, "वाचाल तरच वाचाल...!", असलं काहीतरी भयंकर ऐकण्या, वाचण्याआधीच वाचन रुजले, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते... 

हे नकळत सवयी लागण्याचे अनुभव, इतरांनाही मिळावे म्हणून मी वाचलेल्या पुस्तकांचा ओझरता, तरी  ते पुस्तक वाचायलाच हवे असे वाटणारा परिचय, या Blog Link मध्ये लिहिणार आहे... 

प्रतिसाद, प्रतिक्रिया आणि सूचना अधिक वाचन लेखनास प्रेरणा देतील म्हणून आवर्जून पाठवाल हीच सदिच्छा...




No comments:

Post a Comment

suggestions most wlcome