Saturday, May 09, 2020

सगळं जमतं





एक  जंगल..

जंगलात झाड वडाचं..

झाडावर एका घरटं काऊचं ..

काऊला असतं एक छान बाळ..

काऊ अन् बाळ असतात आनंदात.. 

काऊ चारा आणायला लांब जायचा, बाळ घरात वाट पहायचा..


एकदा काऊनं ठरवलं, आता बाळाला उडायला यायला हवं..

आपला चारा आपणच, आणता यायला हवा..

मग काऊनं बाळाला समजावलं..

चल, आज आपण चारा आणायला, एकत्र जाऊया..
बाळ - पण बाबा, मला उडता तर यायला हवं ना..?


काऊ :- घरात बसला, तर कसं जमणार उडायला?

बाळ :- बाबा मला पण उडायचंय, उंच उंच जायचं.. सांगा काय करायचं? कसं उडायचं?
काऊ :- असं पंख पसरत सावकाश सावकाश हलवत रहायचं, मग वर उंच उंच जायचं , समज मग, आलचं मग उडायला..

                                

बाळ पंख हलवत, जरा वर जाऊन अडखळतं..


काऊ :- शाबास ! छान जमलं, आता असंच सारखं करत रहा. लवकरच उडायला जमणार..

बाळाला आनंद झाला..

आता सतत एकच नाद लागला..

पंख पसरवत, सावकाश हलवत, वर वर जात रहायचा..

सारखा सारखा सराव करायचा..

लवकरचं बाळ उडायला लागलं..

आता बाळ अन् काऊ चारा आणायला जातात..

बाळ उंच उंच उडत.. ना घाबरत.. ना रडत.. बाळानं ठरवलं, मला उडता यायला हवं, अन् उडता आलं.. काय मग पटलं ना ? ठरवलं तर, सगळं जमतं.. बसं, ठरवायला हवं..!
*********************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome