Saturday, May 09, 2020

संकट


सतत करता धडपड,  संकट आलं अवघड


न ऐकता आईचं धडपड कराल,बघा उगाच संकटात सापडाल..कथा आज एक सांगणार.आनंदवन नावाचं असत एक जंगल.वनात असत वडाच झाडझाडावर असतात आई अन् बाळ चार.आईच नाव चंचला खार.

    चंचला खार चाणाक्ष फार  
  बाळांवर नजर धारदार  
   बाळ करत सतत धडपड
पसारा मग घरभर

एकदा असच झालं काय..ऐकताना वाटलं हाय हाय! बाळ चार गाणं गात,रमत गमत वनात भटकत,गंमत जंमत बघत असतात.पाहतात एक पांढरा ससा,बाळांना सांगत हसला कसा 

  बरं का आपलं वन छान  
नंबर एकचा याचा मान
यात झाड फारफार
आनंदाचं खरं सार
टाटा आता मला करा 
काम करणार भराभरा

करत टाटा सशाला,बाळं जातात जंगल बघायला.मग भटकत असताना पाहतात एक झाडझाडावर असत नव फळ पण काटा मात्र अंगभर. बाळं बघतात क्षणभरमनात शंका काय असणार
मग करतात धडपड अन् झाडावरन् एक लहान फळ काढतात,
ढकलत ढकलत घराजवळ आणतात.

आता याच करायच कायकस कळणार खायचं का नाय?

    एक बाळ धावत जातंकरवत आणत,कसबसं फळ कापतात अन् गहजब....पांढर जल पसरत.... कापणार बाळ अडकत.
 एकदम हालचालच बंद. घाबरत बाळं आईला हाका मारतात.

 हाका ऐकून आई .. लगबग करत धावत येई

बाळ धावत आईजवळ जातात,घडलं काय...कस गडबड करत सगळंच सांगतात,"आज वनात भटकताना झाडावरच नवं फळ कसंबसं काढलं,लागला काटा हाताला,पण ढकलत घराजवळ आणलं. सरसर कापलं अन् पांढर जल पसरलं आपला दादा अडकला सांग आई लवकर सांग 

       काय बरं याच नाव वनात काय याचा भाव
        दादाला कसं काढणारअसाच का आता रहाणार?

शांत राहत आईन् अलगद काढल बाळालासांगत इतर बाळांना

         अंगभर काटा पण खायला फार छान
          नाव याच फणस,वनात याला मान
         पण आजचं संकट झालं भलत अवघड 
    बंद करा ना आता सतत करणं धडपड


बाळांना आईच सांगण पटलं,आता छान वागायचं अस ठरवलं. आईला आनंद झाला.चला आता फणस खायला.









********************************************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome