Monday, May 15, 2023

आबोजा


त्यांच्या माझ्या नात्याचे नाव आजोबा ऐवजी आबोजा असे म्हणण्याचा,  गडबड घोटाळा माझ्या न कळत्या वयात झाला, पण त्यात जो गोडवा आणि वेगळेपणा होता, त्यामुळे नंतरही त्यांना नेहमी तसेच हाक मारत राहिलो..

मला अंधुक आठवते, पण आई अनेकदा सांगते की, मी लहानपणी बाईआजी आणि त्यांच्यासोबत खूपदा गजानन महाराजांच्या बागेत जायचो, माझे मन भरेपर्यंत ते मला खेळू द्यायचे..

थोडा मोठा झाल्यावर त्यांच्याकडून त्यांचे मिल्ट्रीचे अनुभव ऐकणे खूप प्रेरणा देणारे होते, ते ऐकताना भारतीय संरक्षण व्यवस्थेचा अभिमान, प्रेम, आदर निर्माण झाला, आणि भविष्यात त्याचा भाग व्हावे याचे बीज मनात घोळत असते..

पत्ते खेळणे मी त्यांच्याकडून शिकलो, त्यात काहीही वाईट नाही, त्यातूनही अनेक क्षमता विकसित होतात, याची पूर्ण खात्री त्यांना असल्याने कधीतरी आमच्या दोघांचे पत्त्यांचे डाव रंगायचे..

दर गुरुवारी संध्याकाळी  *राजे* (त्यांना म्हणे माझे नाव युवराज ठेवायचे होते) अशी हाक मारून गजानन महाराजांचा माझ्यासाठी न चुकता आणलेला प्रसाद ते मला द्यायचे..

अजूनही खूप काही आहे, सांगत राहिलो तर त्याचे स्वतंत्र पुस्तक होईल आणि कमी अधिक फरकाने अनेकांना  असेच वाटत असेल,

अशी ज्यांची सागरा इतुकी माया, आभाळाएवढे प्रेम अनुभवले..
त्यातले काय काय सांगावे, खोलवर रुजलेल्या शब्दात का बांधावे..

हे समजत नसल्याने,

त्यांच्या वेगवेगळ्या गुणांची यादी करायला बसलो, तर कोणता गुण बघितला नाही हे सांगताच येणार नाही..

म्हणून, त्यांच्या नावात सामावणारे गुण किमान माझ्यात येवोत, असे आशीर्वाद त्यांच्याकडे (कारण ते विचार, आशीर्वाद, शुभेच्छा कोणत्या ना कोणत्या रुपात सदैव माझ्यासोबत असणार आहेत) आणि ईश्वराकडे मागतो..

V - Very impressive
Y - Youthful nature
A - Attentive
N - Nobel
K - Kind
T - Thoughtful
E - Energetic
S - Smart
H - Happy go Lucky

E - Enthusiastic
K - Knowledgeable
A - Ambitious
N - Nature lover
A - Active
T - Talented
H - Helpful

P - Playful
A - Astute
N - Nice
D - Dedicated
E - Easygoing

आबोजा, खूप लवकर पुढचा प्रवास सुरु केलात, काय हरवले हे नेमकं नाही सांगू शकत, कारण तुम्ही नाहीत हेच अजून स्वीकारले नाहीये..

एकच सांगतो, माझ्याकडून काही चुकले असेल, राहिले असेल त्याला माझी कमतरता समजून माफ करा आणि यापुढे ज्या ज्या वेळी योग्य- अयोग्य निवडीची वेळ येईल तेंव्हा विचार बनून मार्गदर्शन करा..

तुमचा नातू (राजे).. गंधार

(लेखन जमत नाही म्हणून भावना अव्यक्त राहू नये, म्हणून शब्दांकन आईने करुन दिले आहे आणि म्हणूनच तिच्याच मार्फत हे सर्वांपर्यंत आले आहे..)




2 comments:

suggestions most wlcome