शिक्षक प्रशिक्षण
आय ऑफ सी (Initiative of Change) संस्थेच्या पाचगणी येथील ग्रामपरी विभागातर्फे, ग्रामीण शहरी शैक्षणिक दुवा साधण्यासाठी अर्बन रुरल कनेक्ट नावाचा एक विशेष उपक्रम राबवला जातो.
यात एक ग्रामीण व एक शहरी शाळा निवडून त्यातील काही निवडक विद्यार्थी साधारण दोन अडीच महिन्यांच्या कालावधीत एकमेकांच्या संपर्कात रहातात. यात काही सत्रे ऑनलाईन तर काही प्रत्यक्ष भेटीची असतात. याची सुरुवात दोन्ही शाळांच्या सहभागी शिक्षकांना उपक्रमाचे प्रशिक्षण देऊन होते.
सिटी प्राईड शाळा निगडी तर्फे वृषाली डेंगवेकर आदिती पुराणिक व सायली सोनवणे यांनी दिनांक गुरुवार १२ व शुक्रवार १३ ऑक्टोबर २०२३ रोजी यांनी हे प्रशिक्षण घेऊन या उपक्रमात शाळेचा सहभाग नोंदवला. प्रशिक्षणात अजून तीन शाळांचे शिक्षकही सहभागी होते. पैकी एक शाळा शहरी व दोन ग्रामीण भागातील होत्या.
प्रशिक्षण अतिशय सहज, विविध खेळातून या उपक्रमाची उद्दिष्टे, गरज मांडत पूर्ण झाले. साधारण दीड दिवसाच्या कालावधीत अर्धा ते पाऊण तासाची बारा ते पंधरा सत्रे झाली. शेवटच्या सत्रात एक ग्रामीण व एक शहरी भागातील शाळा यांची निश्चिती झाली. त्यानुसार आपली सिटी प्राईड स्कूल व न्यू इंग्लिश स्कूल बामणोली कुडाळ हे एकत्रित काम करतील असे ठरले. मग आम्ही शाळेला भेट दिली.
तिथे शाळा भेट, आमची ओळख, विद्यार्थ्यांशी गप्पा, मुले मुली कब्बडी सामना, पोवाडा असा छोटासा पण सुंदर कार्यक्रम अनुभवला.
दोन दिवसांचा भरगच्च सत्रांच्या या नावीन्यपूर्ण प्रशिक्षणात खूप ऊर्जा मिळाली. यापुढील वाटचालही फलदायी असेल याची मनापासून खात्री वाटते.
या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल मी वरिष्ठ, व्यवस्थापकीय आणि सहकारी सर्वांचे आभार मानते व मला दिलेले काम यथोचित पूर्ण करेन याची ग्वाही देते.



No comments:
Post a Comment
suggestions most wlcome