🌞🌻🐥🍋🐆☀🍯🍍☀🌽🌻🌞
या देवी सर्व भुतेषु पीत रंगेन संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||
देवी आज तू पीतः म्हणजेच पिवळा रंग धारण करुन ये.
पिवळा रंग आहे शुभ संकेताचा,
म्हणूनच हळद लावून सर्व शुभ कार्याची सुरुवात करतात. ही हळद शास्त्रात जंतुनाशक म्हणून सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्याचप्रमाणे या रुपातील तुझे अस्तित्व सृष्टीतील अहिताचा नाश करणारे होऊ दे..
सूर्य हा या रंगाचा आद्य देव. आमच्याच काही चुकांमुळे त्याची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे, यातून मार्ग काढण्यासाठी तू आम्हाला बळ दे..
या रंगाची उपासना आमच्याकडून सदैव व्हावी यासाठी प्रेरणा दे..
या देवी सर्व भुतेषु विद्या रुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||
तू विद्या रुपात वास्तव्यास ये.
विद्या म्हणजेच तुझे सरस्वतीचे रुप
आज ते काहीसे मलीन होताना दिसत आहे..
आम्ही गतकाळापेक्षा अधिक साक्षर होत आहोत, पण सुशिक्षित होणे अजून तितके जमले नाही. अनेकदा उच्च शिक्षितांमध्येही अज्ञान रुप पहावयास मिळते..
या ज्ञान-अज्ञान, साक्षर-सुशिक्षित रुपांची खरी जाणीव करुन देण्यासाठी तू विद्या रुपात ये.
तुझ्या आशीर्वादाने आमचे ज्ञान, विद्या ही जनहितार्थ कामी येऊ दे.
एक शिक्षिका म्हणून चिमुकल्यांबरोबर काम करताना माझ्या इच्छा, आकांशा त्यांच्यावर चुकूनही लादल्या जाऊ नये याचे सदैव भान मला दे ! त्यांच्यासाठी मी नेहमी प्रेरणा बनून राहू दे. मी त्यांना त्यांचे आभाळ शोधण्यासाठी सहाय्य करावे असेच विचार मला दे !
तमसो मा ज्योतिर्गमय
अज्ञान रुपी अंधकारातून ज्ञानरुपी प्रकाशाकडे व अहिताकडून हिताकडे अमुचा प्रवास घडो असा आशीर्वाद देण्यासाठी ये..
तुझी लाडकी, अभिगंधशाली..
🌞🌻🐥🍋🐆☀🍯🍍🌽🌻🌞



No comments:
Post a Comment
suggestions most wlcome