Saturday, May 09, 2020

चहा

माझा चहाचा कप 



वेळ दुपार ⛅

शाळेतून आल्यावर अर्धा तासाची हुकमी झोप 🥱 झाली...

पुढचे काम करण्याआधी चहा एक सवयी भाग, त्यामुळे यांत्रिकपणे बनवला..🫖

मला बशी शिवाय चहा ☕ प्यायल्या सारखाच वाटत नाही..

सवयी प्रमाणे, दोनदा बशीत चहा घेऊन झाला..

तिसरी वेळ आणि ..

खूप सारा चहा अंगावर, जमिनीवर सांडला, 🥵🥶😱

फार गरम नसल्यामुळे भाजले नाही, पण चटका निश्चित बसला..🤕

घटना घडून गेली होती, उपाय काहीच नव्हता, म्हणून आधी वाढलेले काम निस्तरले..😵‍💫🤐

नंतर असं का झालं, याचा विचार केला..😮

लक्षात आले, आज विचारांची तंद्री जरा जास्त होती..🤯

त्यामुळे माझा नेहमीचा कप सोडून, वेगळ्या कपात चहा ओतला, पुन्हा दुसरा कशाला म्हणून राहू दिले..😐

रोजचा कप आकाराने लहान असल्यामुळे, तिसऱ्या वेळी खूपच थोडा चहा शिल्लक असतो.. 😶

त्याच सवयीने तो ओतला गेला, पण बदलेला कप त्याच्या दुप्पट आकाराचा असल्यामुळे त्यात बऱ्यापैकी चहा शिल्लक आहे, हे लक्षात आले नाही.. 🥴😰

आणि त्यामुळे मग गडबड झाली..🤦🏻‍♀️

गोष्ट म्हणलं तर किती लहान..😬

वाटलं..

इतके छोटे तेही तांत्रिक बदल पण, मला स्वीकारता येऊ नयेत का ..?🤔

तर यावर मला सापडलेले उत्तर.. 😇

तो बदल माझ्या मनाने स्वीकारला नव्हता,🖤❤‍🩹 आणि अर्थातच त्यामुळे हातावर नियंत्रण ठेवता आले नाही..👎🏻

बदल हे होत असतात.. 💕❣️

आणि निसर्गाच्या चक्राचा एक घटक म्हणून ते स्वीकारण्याची ताकद आपल्यात उपजत असते..💗

फक्त मन नावाच्या, न दिसणाऱ्या, लहान मुलाप्रमाणे असलेल्या अवखळ गोष्टीला मात्र आपण गृहीत धरता कामा नये.. 💓

माझे शरीर असे छोटे नाहीतर खूप मोठे मोठे बदलही त्याच्या ताकदी प्रमाणे स्वीकारत असते.. 💛

त्याच्याशी दोन हात करत असते.. 💕

आणि मन मात्र याला सामोरे जाताना.. 💔❤‍🩹❤‍🔥

सुरुवात लहान मुलांप्रमाणे रुसून, रागवून, चिडून, नाहीतर वैतागून करते.. 😶‍🌫😷

जर आपण त्याला गृहीत धरले तर, ते आपल्याला बदलांच्या विरोधात नेऊन अस्ताव्यस्त करते.. 😈👹

पण जर त्याला वेळ दिला.. 💚

 बदल घडत असतातच.. 🧡

त्यात चांगले शोधायचे असे समजावले..💚

तर मात्र मनाची ताकद अशक्य गोष्टीही शक्य करायला बळ देतात..💝

म्हणूनच मी माझ्या मनाला (स्वतःला) वेळ द्यायचे ठरवले आहे.. 😍

कारण सांडलेला चहा फार काही नुकसान करणार नाही..

पण रुसलेले किंवा दुखावलेले मन..?😱

त्यावर न बोललेच बरे..🤐

एक नक्की की सगळच त्याला हवं तसं होणार नाही. (कदाचित खूपस होणार नाहीये)..❤‍🔥

पण जे होणार आहे त्यासाठी तयार व्हायला, त्याचे हट्ट मी पुरवणार आहे..

माझ्या मनाशी गप्पा मारणार आहे..🤩

त्याच्या सोबत फिरणार आहे..🏃‍♀️

आवडती गाणी ऐकणार, म्हणणार.. 🎧
 
त्याच्या सोबत मस्त दंगा करणार..💃🏻

त्याच्या आवडत्या माणसांना भेटणार आहे, माझ्या चिंता त्यांना देणार आहे.. 🤝🏻🤝🏻

अजून त्याला हवं ते खूप काही करणार..💖

मग माझा चहाचा कप काय, काहीही बदलले तरी मी नेहमीसारखी निवांत असणार..🥳🥳🥳

💚💚 तुम्हीही हे करुन बघा आणि अनुभव मला सांगायला विसरु नका.. 💚💚

10 comments:

suggestions most wlcome