आज सांगणार, एक छान कथा. चंपकवन नावचं एक जंगल.
जंगलात असतात काऊ आणि माऊ ससा.
काऊचा रंग काळा तर माऊचा कापसासारखा पांढरा.
काऊ जाड अन् हावरट पण भलताच चाणाक्ष बरं का.
वाघचं लक्ष नसताना, सावकाश घराच मागचं दार गाठल, आत जाणार पण जाडा काऊ दारातच अडकला अन् वाघ पण आलाच.
काऊ माऊला हाका मारत ओरडला,"माऊ मला वाचव मला वाचव"
माऊ धावत मदत करायला आला.
काऊचा हात धरत, आत ओढायला लागला, तर वाघान पाय पकडला
काऊ वाघाला चावला, वाघ कळवळला. असा झटका बसला, अन् पाय सटकला काऊ गडगडत जाऊन घरात पडला.
माऊनं पटकन दरवाजा लावला.
हाय राम !
कसंबसं संकट टळलं.
पण काऊला हावरटपणा फार महाग पडला.
मार बसला, पाय लंगडा झाला, बरं तर बरं माऊन् वाचवल.
काऊन् ठरवलं आता हा हावरटपणा बंद करायचा, छान चपळ बनायच.
ठरवलं तसं झालं, काऊ शहाणा झाला.
**********************************************
ही गोष्ट YouTube video स्वरुपात उपलब्ध आहे. काना,अनुस्वार यात बसवण्यासाठी त्यात काही बदल केले आहेत .
https://youtu.be/aX87R-P0Zrk

सुंदर
ReplyDeleteमनःपूर्वक आभार
Deleteखूप छान। वाचली प्राक्तन ने गोष्ट
ReplyDeleteमनःपूर्वक आभार💐
Deleteत्याला सांगा असा प्रयत्न करून काही वाक्ये तू स्वतः लिहून बघ.