Showing posts with label हावरट_ससा. Show all posts
Showing posts with label हावरट_ससा. Show all posts

Saturday, May 09, 2020

हावरट ससा


आज सांगणार, एक छान कथा. चंपकवन नावचं एक जंगल. जंगलात असतात काऊ आणि माऊ ससा. काऊचा रंग काळा तर माऊचा कापसासारखा पांढरा.

माऊ तसा शहाणा पण काऊ मात्र एक नंबरचा हावरट. सकाळ वा रात्र काऊ सारखा खातंच असायचा. पालक खा, गवत ख, गाजर खा, पाला खा, सारखच आपलं खात रहा.

काऊला असायचं एकच काम खाणं अन् खात राहणं. इतक खाऊन पण, समाधान मात्र जरा नसायचं. खाऊन खाऊन काऊ इतका जाड झाला, इतका जाड झाला, पळणार काय, चालायचाच कसाबसा.

एकदा काऊ व माऊ वनात भटकत असताना लागल एक रान. पहातात तर काय..! रानात वाटाणा, बहरला छान.
माऊच खाण लवकर झालं, पण हावरट काऊच मात्र बका बका खातच बसला. खात असताना काऊला माऊचा आवाज आला,"काऊ आवर लवकर, रानाचा मालक आला बघ, चल, पटकन कारण रानाचा मालक जवळ आला तर मार खावा लागणार. "ए जरा थांब ना माऊ...",काऊ वाटाणा खात ओरडला. "एक नंबरचा हावरट काऊ,ना हाव संपणार ना, ना खाणं उरकणार. याला काय अन् कस समजावणार? बस खातं वाटाणा.आपण आपलं जाऊ या." मनाला बजावत माऊ जंगलात पळाला.

लवकरच रानाचा मालक जवळ आला. काऊला वाटाणा खाताना बघत, जाम रागावला.
काऊला चांगला मार मार मारला. कसाबसा मालकाला गयावया करत, काऊ जंगलात पळाला.
घराजवळ आला, तर दारात वाघ.

काऊ जाड अन् हावरट पण भलताच चाणाक्ष बरं का. वाघचं लक्ष नसताना, सावकाश घराच मागचं दार गाठल, आत जाणार पण जाडा काऊ दारातच अडकला अन् वाघ पण आलाच. काऊ माऊला हाका मारत ओरडला,"माऊ मला वाचव मला वाचव" माऊ धावत मदत करायला आला. काऊचा हात धरत, आत ओढायला लागला, तर वाघान पाय पकडला काऊ वाघाला चावला, वाघ कळवळला. असा झटका बसला, अन् पाय सटकला काऊ गडगडत जाऊन घरात पडला. माऊनं पटकन दरवाजा लावला. हाय राम ! कसंबसं संकट टळलं. पण काऊला हावरटपणा फार महाग पडला. मार बसला, पाय लंगडा झाला, बरं तर बरं माऊन् वाचवल. काऊन् ठरवलं आता हा हावरटपणा बंद करायचा, छान चपळ बनायच.


ठरवलं तसं झालं, काऊ शहाणा झाला.

**********************************************


ही गोष्ट YouTube video स्वरुपात उपलब्ध आहे. काना,अनुस्वार यात बसवण्यासाठी त्यात काही बदल केले आहेत . 

https://youtu.be/aX87R-P0Zrk