Monday, May 03, 2021

गायब


चंपकवनात एका गुहेत प्राण्यांच्या पिल्लांसाठी छान शाळा आहे.

पिल्ले आनंदाने शाळेत जातात आणि नवनवीन गोष्टी शिकत असतात.



नेहमीपेक्षा आज सगळी पिल्ले खूपच आनंदात होती.

ती आज शाळेत मोजायला शिकली होती.

त्यांना एक ते दहा मोजता येत होते.

सारे जण दिसेल ते मोजत होते.


कुणी दहा मणी मोजून माळ बनवली......

कुणी दहा फूले मोजून हार बनवला........

कुणी दहा काड्या मोजून घर बनवले.....

तर कुणी दहा ठोकळे मोजून मनोरा बनवला.....

इतक्यात मधली सुटी झाली.

ज्यांचा डबा खाऊन झाला ते खेळायला पळाले.

वर्गात सोनू हत्तीमोनू हरिणनानू माकडचिनू खार आणि टिनू ससा हे पाच जण होते.

त्यांना अजूनही काहीतरी मोजायचेच होते.

त्यांनी त्यांचे डबे मोजले एकदोनतीनचारपाच.


दप्तरे मोजली एकदोनतीनचारपाच.



पाण्याच्या बाटल्या मोजल्या एकदोनतीनचारपाच.



मग त्यांनी ठरवले आपण किती जण आहोत ते मोजू या.

सोनूने मोजले एकदोनतीनचार.

चारच कसेडबा, दप्तर, बाटली सारे काही पाच आहेत.

आपण चार कसे ? पाच कुठे हरवतो ? 

की लपतो ? की त्याला कुणी गायब करतो?



आता मोनूने मोजले एकदोनतीनचार.

पुन्हा तेच... पाच गायब?

नानूने मोजले एकदोनतीनचार

तरी तेच... पाच गायब?

चिनूने मोजले एकदोनतीनचार

शेवटी टिनूने मोजले एकदोनतीनचार

अजूनही तेच पाच गायब?

एक जण सारखा गायब होतो या भितीने ते जोराने रडू लागले..



आवाज ऐकून त्यांच्या अस्वलताई धावत आल्या.

काय झाले विचारले..

त्यांनी रडतच सांगितले, दप्तरे मोजली पाच,

डबे मोजले पाच, बाटल्या पाच,

वर्गात किती जण हे मोजताना मात्र चारच...पाच गायब.....



ताईंनी मोजून दाखवायला सांगितले.

सोनूमोनूनानूचिनू आणि टिनू एकेकाने मोजून दाखवले.

तरी तेच एकदोनतीनचारच आणि.....पाच गायब?


पण काय होते आहे समजल्यामुळेताई गमतीने हसू लागल्या...

त्यांना हसताना बघून ते पाच जण अधिकच गोंधळले.

ताई म्हणाल्या, "अरे तुमच्यापैकी कोणीच स्वतःला मोजलेच नाही.

काय चुकले कळल्यावर प्रत्येकाने स्वतःला धरुन पुन्हा एकदा मोजले.

एका, दोन, तीन, चार, आणि पाच.



आता आनंदाने ते सगळेही जोराने हसू लागले.

गायब झालेला शेवटी एकदाचा सापडलाच.


<<<<<<<<<<>>>>>>>>

ही गोष्ट बघण्यासाठी... 



No comments:

Post a Comment

suggestions most wlcome