Sunday, May 02, 2021

टिकू

 टिकू आवरतॊ पसारा

 
 
 
टिकूची खोली म्हणजे खेळण्यांचा खजिनाच. खूप सारी खेळणी गाड्यापझल,मॅकानो,वेगवेगळे चेंडू एका ना दोन. खेळण्यासाठी आईनी वेगवेगळे बॉक्सपण आणले होते. मोठे मोठे ५-६ बॉक्स भरून खेळणी होती.



सगळे मित्र टिकूकडे खेळायला यायचेदंगा करायचेमनसोक्त खेळायचे. त्याचे आईबाबा सगळ्यांना खेळू द्यायचेकधीच आरडाओरड नाही की रागवण नाही. त्यामुळे सगळ्यांना टिकूकडे खेळायला खूप आवडायचं.

आई टिकूला नेहमी एकच सांगायची तुम्ही हवं तितकं खेळा फक्त खेळून झालं की सगळी खेळणी बॉक्समध्ये भरुन ठेवत जासगळा पसारा आवरत जा. टिकू हो म्हणायचा पण  खेळण्याच्या नादात विसरुन जायचा. सगळीकडे पसरलेली खेळणी आवरुन आई दमून जायची. टिकूला सांगून सांगून कंटाळली होती.



एकदा असेच सगळे मित्र मिळून गाड्या खेळत होते. मधेच त्यांना  हुक्की आली म्हणून सगळे  गाड्या तशाच टाकून टीव्ही बघायला गेले.आईने पसारा आवरा असं दोन-तीन वेळा सांगितलं पण काही उपयोग झाला नाही .


थोडा वेळानी दाराची बेल वाजली. टिकू उड्या मारत दार उघडायला पळाला . त्याचे आजी आजोबा आले होते. आजोबांनी टिकूसाठी खूप खाऊ आणि खेळणी आणली होती. आजोबा सगळं टिकूला देणार इतक्यात त्यांचा पाय खेळण्यातल्या गाडीवर पडला आणि त्याच्यावरुन ते जोरात घसरुन पडले. त्यांच्या हातातला सगळा खाऊ सांडलाखेळणं तुटून गेलं. आईने पटकन येऊन आजोबांना उठवलं पण आजोबांना खूप लागल होतं.

                                                                                            
आजोबा कसे पडले हे टिकूनी बघितलेल होतंतो आजोबांना सॉरी म्हणला आणि सगळ्या गाड्या आवरुन बॉक्समध्ये भरुन ठेवल्या. आईलाही सांगितलं की माझी चूक झालीतू सांगूनही आम्ही पसारा आवरला नाही. यापुढे असं होणार नाही . खेळून झालं की सगळी खेळणी आवरुन ठेवणार .



आता टिकू शहाणा झाला आहे. खेळणी छान ठेवतो सगळा पसारा आवरुन ठेवतो .



 

********************************************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome