बाळकोबाच्या भूकेला.... 😋 रावण पोह्यांचा तडका.... 🍚
बाळकोबांची स्वारी शाळेतून परतली,
तेच मुळी आरडाओरडा करत....
😲सायकलवरुन टांग उडवत, खाली उतरतानाच, गजर सुरु झाला.
"आई ss ए आई ss भुक्क लागलीए खुप्प."
प्रेमळ आईला आलं गलबलून, त्याला गोंजारत म्हणाली,
"ओ गं माझं पिल्लु, कित्ती सक्काळी शाळेत जात, तेही शायकलीवर...
रोज असतेच पोळीभाजी, आज वेगळ काहीतरी करते, तू हातपाय धुवून ये, मी खाऊ तयार ठेवते ... "
"दो मिनीट मॅगी करणार ...?" विस्फारुन डोळे बाळकोबाने प्रश्न विचारला.
"नाही रे माझ्या राजा, त्याहूनही भारी... पाच मिनिटात रावण पोहे करणार !", झटक्यात त्याला उत्तर मिळालं.
हे काय नवीन, बाळकोबाला प्रश्न पडला...
आधी स्वच्छ होऊन ये, आईने गोड फर्मान काढला...
आधी बाळकोबा आवरुन येणार, की आईचा खाऊ बनणार...
याची न ठरवताही स्पर्धा चालू झाली...
बघतानाही साऱ्यांना मजा फर्मास आली...
हळद-मिरचीचं लोणचं, मेतकूट, मीठ..
सगळं काही आवडीनुसार घेतल...
तापलेल्या तेलात शेंगदाणे, काजू, बेदाणे मस्त तळले अन्,
कांदा-कोथिंबीर बारीक चिरुन, कढईत पुन्हा तेल तापत ठेवले ...
दोन-तीन वाट्या जाडे पोहे, घेतले खरपूस तळून ...
आता सगळं पातेल्यात छान मिसळून, वरुन किंचित लिंबू पिळले ...
भरपूर खोबरं, कोथिंबीरीने डिश सजवताना,
आवाज दिला बाळकोबाला,
"पाच मिनिटातच झाले बरं का तयार
बाळा, तुला ही गंमत आवडेल फार"
आवरुन झटपट धावत येत, बाळकोबा त्यावर तुटून पडला...
पोह्यांची टेश्ट, वाटली भारीच बेश्ट...
लव यू आई फॉर धिस ट्रीट !
रावण पोहे रेसिपी, एकदम हिट !
खुशीत येत स्वारीने, मनमुराद पावती दिली ...
आनंद त्याचा बघून माताही हरखून गेली ...

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome