मी आप्पा अनुभवले...
काही गोष्टी आपण ऐकत असतो, वाचत असतो, शिकत असतो पण त्या हृदयस्थ व्हायला तसे अनुभवत यावे लागतात...
लहानपणापासून आई-बाबांच्या बोलण्यात, शाळेतल्या जयंती-पुण्यतिथी या प्रसंगात, स्वतः वाचनातून प्रबोधिनीचे आद्य संचालक आ. कै. आप्पा पेंडसे यांच्याविषयी खूप ऐकले, वाचले तर, काही वेळा शिकले होते...
आप्पा अतिशय प्रेमळ, चांगल्या गोष्टींचे मनापासून कौतुक करणारे, मुलांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांची ओळख करुन देणारे, प्रसंगी कठोर व्हावं लागलं तरी तेही करु शकणारे होते...
मी स्वतः प्रबोधिनीत शिकत असताना असे शिक्षक नक्की बघितले होते...
१९९८ ला दहावी झाल्यावर प्रबोधिनी बराच काळासाठी काहीशी दुरावली होती...
२००९ ते २०२० खेळगटासोबत पुन्हा प्रबोधिनीमय होते... तेंव्हाही अनेकदा आप्पांच्या अनेक आठवणी, त्यांच्यावरील पुस्तके याचे वाचन, कधी आप्पा बघितलेल्या - अनुभवलेल्या व्यक्तींच्याकडून खूप ऐकत होते...
३० मार्च २०२० ला खेळगटाचे काम थांबवायचे, आणि प्रबोधिनी सोडून नवीन ठिकाणी काम करायचे निश्चित झाले...
निर्णय खूप आनंददायी नसला तरी घेतला, कारण दहा वर्षे एकाच प्रकारचे काम करून आलेले साचलेपण त्रासदायक होत होते....
आणि प्रबोधिनीत म्हणे माझ्यासाठी वेगळी कुठली संधी उपलब्ध नव्हती...
(निर्णयात बदल होण्यासाठी माझ्या बाजूने सर्व प्रयत्न मी अर्थात केले होते)...
कारण अनेक होती, पण तो आत्ताचा मुद्दा नाही...
करोनाने १६ मार्च २०२० पासून शाळा बंद झाल्या, २२ पासून पूर्ण देशच बंद...
प्रबोधिनीचा म्हणावा, तसा निरोपही घेता आला नाही...
नवीन संधी एप्रिल ऐवजी जूनपासून...
सिटी प्राईड स्कूल निगडी एक प्रथित यश, सध्या पिंपरी चिंचवड परिसरात सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या शाळेत प्राथमिक विभागात मराठी विषय शिक्षिका म्हणून रुजू झाले...
शाळेच्या संचालिका डॉ. सौ. अश्विनी कुलकर्णी, या पुणे प्रबोधिनीच्या विद्यार्थिनी आहेत... हे ऐकून माहित होते...
पण वर्षभर छोट्या छोट्या गोष्टीत त्यांची ती ओळख बघायला मिळाली...
वेळ, परिस्थिती आणि कालानुरूप निर्णय घेणे...उत्तम नेतृत्व, मोकळेपणाने बोलणे, गरजेनुसार समजावून सांगणे किंवा काहीस रागावणे... भरपूर कौतुक करणे हे नित्य अनुभवायला मिळत होते... तेही सत्तर टक्क्यांहून अधिक काम दूरस्थ... ऑनलाइन होते तरीसुध्दा...
प्रबोधिनीचे आम्ही सनातनातील सनातन आणि आधुनिकातील आधुनिक या तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव ऑनलाईन शाळा या नव्या आव्हानाला सामोरे जाताना घेतला...
एप्रिल-मे मध्ये सिटी प्राईड शाळेच्या मॅनेजमेंटने सर्व शिक्षकांना वेगवेगळ्या अँपचे प्रशिक्षण दिले होते... (त्यावेळी मी जॉईन झाले नव्हते)
नंतर अतिशय अभ्यासपूर्वक Microsoft Teams ची केलेली निवड... त्याचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना दिलेले पेड व्हर्जन, प्रशिक्षण... या सगळ्यात जे नवे आणि उत्तम ते सर्व हवे ही भूमिका खूपच भावली...
या अँपमुळे तंत्रज्ञानाच्या अनेक नव्या गोष्टी वर्षभर शिकले आणि आजही शिकतच आहे... कारण ते अँप दर महिन्याला उपडेट होत असते...
याशिवाय फक्त ऑनलाईन तास इतकीच भूमिका पुरेशी नाही, नेट किंवा इतर कारणाने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी व्हिडिओ, सर्व नोट्स pdf...
वर्गशः पालक बैठका, त्यातही प्रत्येक वेळी अश्विनी मॅडमची उपस्थिती, पालक-विद्यार्थी यांचे प्रश्न, अडचणी याची दखल, त्यावर लगेच उपाय शोधणे, वेळोवेळी योग्य ते बदल केले..
ऑनलाईन शाळा, याचा परिस्थितीमुळे स्वीकार करताना, प्रत्यक्ष शाळेच्या कोणत्याही चांगल्या गोष्टी हरवणार नाहीत याची वेळोवेळी घेतलेली काळजी...
सर्व सण साजरे झाले, स्पर्धा झाल्या इतकंच काय पण लायब्ररी पिरियड, वाचन व्हायला हवे त्यासाठी इ-बुक्स पाठवली गेली...
सर्वच गोष्टींचा केलेला इतका चौफेर विचार, मला खूप काही शिकवत होता आणि आहे...
सलग दुसऱ्या वर्षीही, अधूनमधून चालू असलेले लॉकडाऊन, ऑनलाईन शाळा याचाही पुन्हा पूर्ण स्वीकार आहेच...
पण तरी गेल्यावर्षीच्या पद्धतीत अनेक सकारात्मक बदल जे विद्यार्थी, शिक्षणाचे बदलते रुप यासाठी अधिक उपयुक्त होत आहेत...
असे सारे अनुभव सतत घेत असताना... आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी असायला हवे आणि आहोत याचा मनस्वी आनंद आहे...
नव्या ठिकाणी रुळताना, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे... सोबत काम करणारे सहकारी... या बाबतीतला अनुभव तर इतका छान....
नेहमी कानावर पडणारे शब्द... CPS Family... व्हाट्सएप पहिला गृप जॉईन केला तोही CPS... जिथे फक्त निगडीच नाही, तर इतर दोन्ही मोशी आणि नव्याने सुरु झालेली रावेत शाखेत कार्यतर असणारे सर्वजण समाविष्ट आहेत... या गृपवर शाळेच्या संबंधित गोष्टी, शिक्षण विषयक गोष्टी, वैयक्तिक आनंद, शुभेच्छा, प्रश्न, काळजी, घडलेल्या दुःखद घटना असे सर्व येत असतात... ज्यातून फॅमिली हा नुसता शब्द नाही, हा अनुभव घेता येतो...
याशिवाय डायरेक्टर, प्रिन्सिपल, कॉर्डिनेटर, सहशिक्षक, पालक आणि विद्यार्थी बालमित्र या सगळ्यांनी पूर्ण वर्षभर इतके छान सहकार्य, मार्गदर्शन प्रेम, पाठींबा, कौतुन दिले की मला नवीन ठिकाणी काम करते आहे, असे कधी वाटलेच नाही....
इतका वेळ वाचताना वाटेल, या सगळ्यात आज आप्पा अनुभवले...ऐकले...
हे कुठे विसरले की काय ? तर अजिबात नाही...
प्रबोधिनीच्या श्रुतीताई मी माझ्या कामात बदल करणार हे कळल्यावर म्हणल्या होत्या, की तू प्रबोधिनी सोडणार असा विचार का करते, कदाचित नव्या ठिकाणी विचारातून, कृतीतून प्रबोधिनी अनुभवणार असे म्हण...
आणि अगदी असेच काहीसे आज घडले... १६ जून २०२१.. घटना अगदीच किरकोळ...
फक्त प्रत्यक्ष शाळेत या गोष्टी जाणवत नाहीत, त्या ऑनलाईनमध्ये पालकांना जाणवल्या इतकेच...
एरवीही मी नाही, तर सगळेच शिक्षक अभ्यासक्रम, विषय, धडे यासोबतच मुलांचे वैयक्तिक प्रश्न-आवड-नावड याकडेही बघतच असतात...
आवश्यक तेंव्हा त्यांना मदत, मार्गदर्शन, पाठींबा, शाबासकीही देत असतात..
असेच काहीसे घडले... आणि एका सजग पालकांनी त्याची नुसतीच दखल न घेता तो आनंद शाळेच्या ऍडव्हाजरी (निवडक पालक-शिक्षक गट) व्यक्त केला...
मला वैयक्तिक संपर्कही केला... मी काही फार वेगळे केले नव्हतेच त्यामुळे मी त्यांच्या आनंद, कौतुकाचा स्वीकार केला तरी स्वस्थ, शांत होते...
मग ते कौतुक इतर सहकारी शिक्षक, कॉर्डिनेरट यांच्याकडूनही मिळाल्यावर आतून छान वाटत असले तरी अजूनही पाय जमिनीवरच होते...
पण संध्याकाळी साधारण सहाच्या सुमारास शाळेच्या संचालिका अश्विनी मॅडमचा फोन आला... आणि मग खूपच वेगळे वाटले, भरुन आले... आपल्या कामाची अजून कोणती पावती हवी... असेही वाटले...
त्या म्हणाल्या, "वृषाली मला माहित नाही नेमकं काय झालं ते, पण पालकांनी घेतलेली दखल... केलेले कौतुक हे नक्की सांगते की मी तुझी केलेली निवड आज तू सिद्ध करून दाखवली... आपण शिक्षक फक्त पुस्तकी शिक्षण देण्यासाठी नाहीत तर शाळा ही दुसरं घर असायला हवी... आणि तू ते सहज केलेस हा अनुभव पालकांनी सांगितला…
(आम्ही अर्धा तास बोलत होतो, त्यामुळे सगळाच तपशील शब्दात उतरवणे शक्य नाही... त्यात वरच्या सगळ्या गोष्टी एप्रिल महिन्यात त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलूनही, पुन्हा एकदा व्यक्त केल्या... अनेक वैयक्तिक बोलणे झाले, प्रश्न-अडचणी सांगितल्या... त्यात त्यांच्या धीराच्या- आधाराच्या शब्दांत माया, काळजी, प्रेम जाणवले...)
आणि सगळ्यात महत्त्वाचे त्यांचे शब्द...
"वृषाली, तू प्रबोधिनीची आहेस म्हणून माझ्या जास्त प्रेमाची आहे..."
यातच मला आप्पा अनुभवायला मिळाले... ऐकायला मिळाले...
गोष्टी, अनुभवकथन, वाचन यातून हे सगळे आप्पांचे गुण माहीत होते...
पण त्यापेक्षाही...
नकळत गुरुवंदनेतील ओळी स्फुरल्या...
स्वीकारुन ही नमन सुमने आशीर्वच द्यावा...
तुमचे हे व्रत पुढे चालवू, निरलस श्रमुनी सुयश मेळवू,
तुमच्या कर्मरतीतून, आमुच्या मनी आहे रुजला,
'कर्मातच ज्ञानाचे सार्थक' - हा तुमचा सांगावा...
नमस्तुते गुरुदेवा...
आ. आप्पांचा वारसा अतिशय समर्थपणे आणि सहजतेने पुढे चालवणाऱ्या, विद्यार्थी-पालक- सहकारी शिक्षक सगळ्यांसाठी वेळ, परिस्थिती यानुसार कधी प्रेमळ, कधी कडक, कधी कणखर, कधी सुहास्य-आनंदी अशा वेगवेगळ्या रुपात अश्विनी मॅडममध्येच मला आप्पा दिसले...
हे जेंव्हा मी बाबांना, आईला सांगितले तेंव्हा अनेक जुन्या आठवणी निघाल्या... गप्पा झाल्या...
असेच समृद्ध करणारे अनुभव यापुढेही येत राहोत... माझ्या वैयक्तिक प्रगतीचा आलेख या साऱ्यात उंचावत राहो...
त्यात कालानुरूप स्वीकार, तरी मायेची झालर, कर्तव्याची, सामाजिक बांधिलकीची जाणीवही राहो हीच सदिच्छा व्यक्त करते आणि नवे काही सापडेपर्यत थांबते...
*********************
Nice
ReplyDeleteमनापासून आभार !
DeleteVery nice
ReplyDeleteमनापासून आभार !
Deleteखूप छान अनुभव लेखन वृषालीताई, आपण उत्तम शिक्षक आहात असेच छान काम पुढे ही करत रहा, यासाठी खूप खूप शुभेच्छा! उत्तम आचार उत्तम विचार सतत पेरत रहा.
ReplyDeleteमनापासून आभार !
Deleteउत्तम गुण जाणणाऱ्या गुण ग्राहक नेतृत्वाने व्यक्तिमत्त्व अधिक फुलत असं प्रबोधिनीत शिकले होते, त्याचा अनुभव नक्कीच अजून उत्तम बनवेल.
तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या.
खूप काही शिकलीये तुमच्याकडूनही..
खूप छान लिहिलं आहे वृषाली ताई... ताईच म्हणेन कारणही प्रबोधिनीच..
ReplyDeleteमाझा स्वतःचा तुमच्या बद्दलचा अनुभव छानच आहे...उत्तम लिखाण आणि तुमचं व्यक्तिमत्व मलाही कायमच भावलंय...पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
मनःपूर्वक आभार,
Deleteपण आपले नाव दिसत नसल्याने, प्रतिसाद द्यायचा राहून गेला
त्यासाठी क्ष्मस्व
👌👌🤗🤗🎉🎉🎉🙏🙏🙏
ReplyDeleteमनापासून आभार ,💐
Delete