Sunday, May 14, 2023

बाबा

 व्यंकटेश एकनाथ पांडे... माझे बाबा 

 मार्च २०२३, साधारण रात्री आठ वाजता..

सांडूनिया ही जरजीर्ण  वस्त्रे मनुष्य घेता दुसरी नवीन..

तशीच टाकून जुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी..

श्लोक म्हणत बाबांच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली..

या श्लोकाचा किंवा त्यानंतरच्या साऱ्या उपचाराचा एक वेगळाच अनुभव घेतला, कारण काही नाती आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत हवीच असतात..

त्यांच्यासाठी अशी कोणतीही वेळ येईल, याला मनाने मान्यताच नसते..

आनंद चित्रपटात म्हणल्याप्रमाणे, आपण फक्त एक कटपुतली आहोत, विश्वाच्या या रंगमंचावर कोणतीही गोष्ट आपल्या इच्छेने घडतच नसते..

याचा पुरेपूर अनुभव घेतला..

याला परिपक्व होत जाणे म्हणत असतील, तर मला नाही व्हायचे मोठे..

याची तरी कुठे परवानगी आहे..?

त्यामानाने आपण भाग्यवान की, वयाची चाळीस वर्ष आपण बाबांच्या वात्सल्याचा मनसोक्त आनंद घेतला..

५ मार्च नंतर सलग काही दिवस बाबांचे मित्र, नातेवाईक भेटायला यायचे, आठवणींनी गदगदून जायचे..

अनेकांनी आपल्या भावना शब्दात मांडल्या..

तूही लिहितेस ना, नेहमी मग बाबांविषयी लिही, असे सांगितले..

पण मला नेहमीच कुणाबद्दल बोलायचे, लिहायचे म्हणले, की ती व्यक्ती समोर हवी असते..

माझ्यासोबत ज्यांच्या विषयीच्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा अर्धा वाटा आहे, ते सारे फक्त आमच्या दोघांचे आहे..

ते त्यांच्याशिवाय कसे सांगू..

या संभ्रमात इतके दिवस गेले,

जन पळभर म्हणतील हाय हाय..

या गीताचा प्रत्येक शब्द खरा होताना, गेले तीन महिने अनुभवत आहे..

स्वतः मी सुद्धा माझ्या दिनक्रमात अडकून गेलेच ना..

आठवण यायला एकही सेकंद त्यांना विसरलेले नाही, ते शक्यही नाही पण त्याच्या शरीराने सोबत नसण्याचा आता हळूहळू स्वीकार केला आहे..

लिहायला घेतले कारण, ते विचार, संस्कार याने सदैव सोबत असणारच आहेत..

आणि शब्दात व्यक्त होताना, त्यांच्यासोबत अनेक क्षण पुन्हा नव्याने जगता येणार आहेत..

हे आमच्या दोघांचे, खूप वैयक्तिक असले तरी, अनेकांना त्यातून त्यांना भेटता येईल, अनुभवता येईल म्हणून शेअर करणार आहे..

अर्थात ते थोडक्यात असणारच नाही..

सलग एका बैठकीत, एका दिवसात पूर्णही होणार नाही, जसे जसे सुचेल, सांगावेसे वाटेल तसे तसे लिहित राहील,






17 comments:

  1. पांडे काका एक उत्तुंग व्यक्तित्त्व होते..... ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या उभारणीत काकांचा मोठा वाटा होता.... काका सगळ्यांच्या मनात कायम असतील

    ReplyDelete
    Replies
    1. अगदीच
      प्रतिसादासाठी मनापासून आभार 💐

      Delete
  2. Accomplished person and thorough gentleman! Will be missed forever.

    ReplyDelete
    Replies
    1. ते असणार आहेत आपल्याबरोबर नेहमी ❣️

      Delete
  3. खूप अप्रतिम शब्दांकन.. त्यांच्या बद्दल लिहावे अणि वाचावे ते थोडेच..
    मदतीसाठी सर्वात पुढे.. आदर्श

    ReplyDelete
    Replies
    1. त्यांना आदर्श मानताना, तूही नेहमीच कृतीतून एक आदर्श मार्ग चालत असतोस,जो माझ्यासाठी सदैव एक आकर्षण आहे..

      Delete
  4. सुंदर शब्दबद्ध... पुढील आठवण स्वरुप लेखाच्या प्रतिक्षेत

    ReplyDelete
  5. Khop chan ... We always miss our kaka...

    ReplyDelete
  6. प्रसन्न, हरहुन्नरी आणि मदतीचा हात तत्परतेने पुढे करणारे व्यक्तिमत्व म्हणजे पांडे काका. तुझ्या शब्दांनी त्यांचा बद्दल अजून काही छान पैलू समजतील.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच प्रयत्न करेन..,💐
      अशीच प्रेरणा देत रहा..🙏

      Delete
  7. पांडे काका शब्द आठवले, उच्चारले तरी ती हसरी सदैव मूर्ती समोर येते. प्रतेक व्यक्तीला त्यांचा वेगळा पैलू दिसला असेल, पण मुलगी म्हणून तुला वेगवेगळ्या प्रसंगातून ते भेटले असतील प्रत्येक प्रसंगी वेगळे व्यक्तीमत्व. ते तुझ्याच लेखनातून प्रगट होतील

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. नक्की प्रयत्न करेन💐
      त्यासाठी तुमचे असेच आशीर्वाद राहू दे 🙏

      Delete
  8. Very nicly & correctly written. God bless you beta

    ReplyDelete

suggestions most wlcome