Sunday, December 08, 2024

सहल

 

एक होता सोन्या आणि एक होती राणी 

ताई म्हणे त्यांना, चला गाऊ गाणी 

जाऊ सगळे फिरायला, गंमत जंमत करायला

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक..  ||धृ ||


ताई बसली घोड्यावर, दोघे बसले घोड्यावर  

निघाले सगळे फिरायला, घोडा लागला दौडायला 

मज्जा लागली यायला, गाणी गायला,  ता थै ता थै तक



इतक्यात लागले जंगल, तिथे दिसला वाघोबा

दोघे लागले घाबरायला, रडारड करायला

ताई म्हणाली, "थांबा, 

तिने काढला धनुष्य, त्याला बाण लावला, 

बघून वाघोबा घाबरला , झाडीमध्ये पळाला.."

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक.. || १ ||


एक होता सोन्या आणि एक होती राणी 

ताई म्हणे त्यांना, चला गाऊ गाणी 

जाऊ सगळे फिरायला, गंमत जंमत करायला

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक..  ||धृ ||

वाटेत दिसली बैलगाडी,  त्यात बसली मंडळी 

वाजू लागली घुंगरू वाळी, छन छन छन

गेले शेतात फिरायला, पीक पाणी बघायला

हुरडा, चिंचा खायला, विहीरीचे पाणी प्यायला, 

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक.. || २ ||

इतक्यात दिसला नागोबा

दोघे लागले घाबरायला, रडारड करायला

ताई म्हणाली, "थांबा, 

हा मित्र सर्वांचा, रक्षणकर्ता शेताचा,"

सर्वांनी हात जोडले , नागोबा मग निघून गेला 

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक.. || ३ ||

एक होता सोन्या आणि एक होती राणी 

ताई म्हणे त्यांना, चला गाऊ गाणी 

जाऊ सगळे फिरायला, गंमत जंमत करायला

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक..  ||धृ ||

मग दिसली झुकझुक गाडी, त्यात चढली मंडळी

गाडी निघाली भक् भक भक् 

वाटेत लागला बोगदा, गुडूप अंधार झाला, 

मज्जा लागली वाटायला, मुले दंगा करायला

झाडे लागली पळायला, स्टेशन मागे पडायला 

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक.. || ४ ||


एक होता सोन्या आणि एक होती राणी 

ताई म्हणे त्यांना, चला गाऊ गाणी 

जाऊ सगळे फिरायला, गंमत जंमत करायला

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक..  ||धृ ||

एक छान बस दिसली, गावोगावी फिरणारी

सारेजण लगेच बसली, नाव तिचे लाल परी, 

रस्त्यावरून पळू लागली, सगळ्यांना ती आवडली

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक.. || ५ ||


एक होता सोन्या आणि एक होती राणी 

ताई म्हणे त्यांना, चला गाऊ गाणी 

जाऊ सगळे फिरायला, गंमत जंमत करायला

दोघे लागले नाचायला, ता थै ता थै तक..  ||धृ ||


बघता बघता रात्र झाली, मंडळी आपली थकून गेली..

गंमत जंमत खूप केली,सारी मग घरी परतली, 

जेवण करून झोपून गेली, ता थै ता थै तक.. || ६ ||





No comments:

Post a Comment

suggestions most wlcome