पुस्तक परिचय
लेखिका - अँना सिवेल... अनुवाद - स्मिता लिमये.
ही एका घोड्याची आत्मकथा आहे. प्राचीन काळापासून जगभरच्या संस्कृतीचा भाग व मानवाचा लाडका प्राणी घोडा..
बुद्धीने तल्लख, प्रेमास उत्तम प्रतिसादी आणि ईमानी..
प्राणी जीवनावरील एक यशस्वी कादंबरी..
घोडागाडीचे काम करणाऱ्या कथेच्या लेखिकेला, या प्राण्याविषयी कमालीची आत्मीयता वाटते..
स्वतःच्या आजारपणावर विरंगुळा म्हणून आपल्या घोड्याची आत्मकथा लिहावी, या कल्पनेतून पुस्तकाची निर्मिती झाली आहे..
पाळीव प्राण्यांना उत्तम मालक मिळाल्यास ते मृत्यू शय्येवरून बाहेर उठून, दीर्घायुष्यी कसे होतात, हे कथेत भावपूर्ण गुंफले आहे..
कथेच्या शेवटाकडे येताना घोड्याला पुन्हा एक नवा चांगला मालक मिळतो..
मरणासन्न ब्लॅक ब्युटी पुन्हा धट्टाकट्टा होऊन,अधिक वीस वर्षे कसा जगतो, यातून पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, या विषयीचे अनेक संदर्भ लेखिका मांडते.
पुस्तकात मला भावलेल्या गोष्टी
● पाळीव प्राण्यांचे जीवन व त्यांचे प्रश्न याची कथारूप मांडणी.
● पाळीव प्राणी जीवनातील छोटे छोटे बारकावे.
● स्मिता लिमये यांनी इंग्रजी कथेचा अतिशय सुंदर केलेला भावानुवाद.
● पाळीव प्राण्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन.
● लेखिकेच्या लेखनाची एक वेगळीच शैली... घोड्याच्या जागी स्वतःला ठेवून केलेले लिखाण.
● थोडक्यात प्राणी प्रेमिकांनी आणि ज्यांना प्राणी सांभाळायचे आहेत त्यांनी तर जरुर वाचावे असे हे पुस्तक आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@

👌🏻
ReplyDelete🫶🏻🫰🏻
Deleteछान उपक्रम
ReplyDeleteमनापासून आभार 🫰🏻👌🏻
ReplyDeleteउत्तम लेखन व संकल्प.. शुभेच्छा
ReplyDeleteदिविजा चे हे खूप आवडते पुस्तक आहे. तिला हे परिक्षण वाचायला नक्की जे.. मराठी दिन अशा पद्धतीने साजरा करण्याची कल्पनाच भन्नाट आहे.
ReplyDelete👍🤝
ReplyDelete