मी माझे कुठेतरी जाणीवपूर्वक थांबविलेले, लेखन पुन्हा सुरु करायचे ठरवले..
तसे करताना अर्थात कोणाला विचारले वा सांगितले नाही..
माझे लेखन स्वान्त सुखाय असले तरी त्यावर माझ्याहून अधिक प्रेम, माया करणारे अनेक आहेत..
माझा व्यक्त होण्याचा, रिता होण्याचा तो सहज, सोपा उपाय आहे, हेही अनेकांना माहीत आहे..
अशा सगळ्यांनी लेखन का बंद केली, याची विचारणा केली, मी माझ्याबाजूने उत्तरे दिली..
पण आपले लेखन इतरांना आनंद, प्रेरणा, स्वशोधन अजून अनेक गोष्टी देणारे असेल तर ते असे थांबवणे योग्य आहे का..?
असा प्रश्न त्रास देत होता, मग पुन्हा एकदा नव्याने लिहायला सुरू करुया..
मी लिहायचे ठरवते, पण मागे फिरून वाचताना, असे लिहिणे माझी क्षमता नाही, तर माझ्या माध्यमातून अज्ञात शक्ती लिहून घेते असे वाटते..
म्हणूनच मग मला आवडते यासाठी लिहिण्यापेक्षा अनेकांना वाचायला आवडते यासाठी लिहू या..
असे नव्याने ठरवले, मग त्यासाठी संकल्प केला..
त्याला उचित वेळ मराठी दिन साजरा होतो, तो फेब्रुवारी महिना निवडला..
कारण मराठी भाषा माझ्यासाठी प्रेम, जिव्हाळा आणि हातखंडा आहे..
माझ्यासारखेच प्रेम मराठी भाषेवर अनेकांनी करावे या उद्देशाने हा लेखन प्रपंच सुरू केला..
त्यासाठी अर्थात अभ्यास, वाचन करावे लागणार होते..
हे मी करणार आहे, माझ्यासोबत तुम्ही सहभागी व्हा, असा विनंती, आग्रह करणारा संदेश पाठवला आणि त्यासोबत लेखनाचा पहिला आंतरजाल दुवा पाठवला (लिंक)..
दुवा..
इथे हा हिंदी मधला शब्द घेतला, तर प्रार्थना, विनवणी, आशीर्वाद या अर्थाने तोही योग्यच आहे..
पण मला मराठीत सांगायचे आहे..
ज्याचे पर्यायी शब्द जोडणी, संबंध, नात, सांधा असे आहेत..
माझे लेखन आणि रसिक वाचक यांना जोडणारा, सांधणारा, नवे नाते तयार करणारा असा तो दुवा, किती चपखल शब्द आहे ना ..? इंग्रजी लिंक या शब्दासाठी..!
आज हा विषय घ्यायचे कारण की व्यापार व्यवस्थापन आपल्या नकळत आपल्यावर अनेक प्रकारचे नवे खर्च लादत असतात..
कालचे पुष्प पाठवताना ब्रॉडकास्ट लिस्टची मोफत क्षमता संपली आहे, असा संदेश मिळाला..
अनेक गटांवर मला गेले, अनेक दिवस फक्त मीच संदेश पाठवत आहे असे जाणवले..
आणि माझ्या एका मित्राची आठवण झाली, ज्याचे म्हणणे आहे की ब्लॉगवर लिहिल्यावर प्रत्येक वेळी नव्याने असे दुवे (लिंक) पाठवण्याची गरज नसते..
ज्याला ते आवडतेे, त्याने सबस्क्राईब केले की आंतरजाल स्वतःहून आपले काम चोख करते..
तंत्रज्ञानात खूप तज्ञ असणाऱ्या त्या मित्राचे अगदी योग्य असले तरीपण शेवटी ते यांत्रिक काम, त्यास भावनेचा ओलावा कसा असणार..?
माझ्यासाठी ती लिंक नाही दुवा आहे..
माझ्या वाचकांना माझ्याशी जोडणारा, जे दैनंदिन कामात खूप व्यस्त असतात..
आंतरजाल एकदा आठवण करून सोडून देते, मी पाठवलेला दुवा थोडा रिकामा वेळ मिळाला की खुणावतो..
हा दुवा सहज पुढे पाठवता येतो, त्यातून नवी नाती तयार होतात, नवे रसिक वाचक लाभतात..
असे असले तरी परवा एका चित्रपटात असे अनेक संख्यात्मक जास्तीच्या माहितीचे व्यवस्थापन करणारे तंत्रज्ञान असा प्रकल्प पाहिला..
आणि ठराविक काळानंतर सगळे संदेश आपोआप पुसले जावे, हा कायप्पाचा गुण (व्हॉटस् फिचर्स ) आठवला..
शिवाय कालच्या संदेशात विशिष्ट उद्देशाने नवा गट (व्हॉटस् अँप गृप) तयार करा असे सुचविले होते..
म्हणले चला आज हाच विषय मांडूया..
नुसता माझ्या वाचन प्रेमी रसिकांचा नवा गृप बनवते आहे, हा त्याचा दुवा इतके कोरडे सांगण्यापेक्षा, यात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करू या, हे ठरवून आजचे लेखन केले आहे..
लिंक या इंग्रजी शब्दाची भावनिक मांडणी करण्याचा मोह आवरला नाही इतकेच..
मांडलेले आवडेल पटले असेल, थोडक्यात नसणारे माझे लेखन वाचायचे असेल.. तर माझ्या गटात जरूर सहभागी व्हा, इतरांनाही हा दुवा नक्की पाठवा..
https://chat.whatsapp.com/FfXePIjrjjPLNrp4LfsLg7?mode=gi_c
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome