पाऊले चालती, सिपीएसची वाट
नवं शिक्षणाचा, आहे रम्य थाट || धृ ||
ऐकू येई हाक, चिमुकला तो नाद
होता पूर्ण तयारी, तेंव्हा देग साद || १ ||
मातृपितृ, गुरुजनांचे, रुजले विचार
जन कल्याण व्हावे, चिंतन साचार || २ ||
गुणी संचालिका, अभ्यास अफाट
सदस्य संगती, दिवास्वप्न हे विराट || ३ ||
पालकांची लाभता, भक्कम ही साथ
हे भविष्य उद्याचे, हा व्रतस्थचि पथ || ४ ||
असे अग्रस्थानी, बाळचमू हा प्रत्येक
नित्य प्रकटेल इथे, मग नेतृत्व सुरेख || ५ ||
ऐक हे ईश्वरा, अभिगंधशाली मागे दान
घडो वारी शिक्षणाची, मज असो भान || ६ ||

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome