मीही निसर्गच
(३ ऑक्टोंबर २०१८)
एक गोष्ट घडली..
म्हटलं तर खूप किरकोळ, म्हटलं
तर खूप वेगळी...
मी शाळेच्या गेटपाशी, नेहमीप्रमाणे मुलांना घेण्यासाठी थांबले होते...
तिथे बदामाचे भले मोठे झाड असल्यामुळे, खूप साऱ्या खारुताई बिनधास्त फिरत असतात...
मुलांसाठी आणि आमच्यासाठीही, त्यांना बघणे हा आनंदाचा आणि गमतीचाही भाग असतो...
तर तिथे मी एका बाबा पालकांशी बोलत होते...
इतक्यात आमच्यापासून वीस-तीस फुटावर झाडावरुन जोराने खाली काहीतरी
पडले...
खारुताई, पोपट, कावळेदादा यांच्यामुळे, बदाम तुटून नेहमीच पडत
असतात...
तसेच काही असेल असे वाटले पण आवाजाने लक्ष तिकडे गेलेच...
तर
...
......
......
ती पडलेली गोष्ट म्हणजे एक खारुताई होती...
चारही पाय वर करुन पाठीवर
पडलेल्या तिला, बघून क्षणभर बधीर झाले...
मग ओरडले...
मी आणि ते बाबा पालक दोघेही थोडे पुढे गेलो...
तोवर या बाईसाहेब सरळ झाल्या, आणि सरसर झाडावर पसारही झाल्या...
ती खरंच नीट आहेत का...? तिला काही झाले नसेल ना...?
याची खात्री करायला आम्ही
झाडाजवळ गेलो, पण तोवर तीने झाडाचे टोक गाठले होते...
दिवसभर हा प्रसंग मनात घोळत होता...
लेकाला सांगितला, तर त्याला वाईट वाटले, अस्वस्थ झाला...
मनातून बरं वाटलं, याच कोवळेपण अजून टिकून आहे...याच समाधान वाटलं...
अहों ना सांगितले तर, त्याने कामाच्या ठिकाणी अनेकदा असे
बघितले होते..
त्यामुळे त्याला फार काही विशेष वाटले नाही...
त्या क्षणाला किंचित राग आला, किंचित दुःखही झाले...
नंतर प्रसंगाची तीव्रता कमी झाल्यावर, मनात विचार आले...
माणूस म्हणून आपण, छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या करतो...
तेच हे प्राणी-पक्षी, प्रत्येक घटना अगदी सहज स्वीकारुन
पुढे जातात...
माझ्या त्या खारुटलीला लागले असेल किंवा नसेल...
निसर्गात त्यासाठी डॉक्टर नाही , दवाखाना नाही...
पण जे
झाले ते स्वीकारुन, पुन्हा नव्याने प्रयत्न करायचा हे मात्र तिला माहिती आहे...
मी ही निसर्गाचा एक भाग आहे...
मग मलाही हे जमले, तर काय मजा येईल नाही...!
शरीरावर झालेल्या जखमांचे जमेल की नाही, माहिती नाही...
पण मनावर होणाऱ्या, अशा
छोट्या-मोठ्या आघातांवर, मी नक्कीच मात करायला हवी असे वाटून गेले...
आणि म्हणूनच त्या खारोटीला मी माझ्या शब्दात बंदिस्त करुन, मनावर खोल बिंबवले...
तिची ही आठवण माझ्या मनाला सदैव संजीवनी देत राहील हे नक्की... !
फोटो गुगलवरुन घेतला, कारण तेव्हा काहीच सुचले नाही...
आणि फोटोची ती वेळही नव्हती...


संवेदनशील घटना तितक्याच हळुवारपणे प्रकट झाली आहे. छान लेख.
ReplyDeleteमस्तच आहे गं!
ReplyDeleteश्रीमती आंबेकर
Superb!Very sensitively expressed over all aspects.
ReplyDeleteSushamaa Kondhare
संवेदनशील मनाचे खूप सुंदर लेखन .
ReplyDeleteE. Q. चे छान उदाहरण
ReplyDeleteखूपच हृदयस्पर्शी
ReplyDeleteव्वाह
ReplyDelete