एक घनदाट जंगल, नाव आनंदवन.
आनंदवनात रहायचा चाऊ ससा...
एक नंबरचा घाबरट बरं का,
जरा आवाज झाला, तर पसार झालाच समजा...
एकदा काय झालं !
तसं बघायच तर गंमतच...
एका झाडाजवळ, चाऊ बसला गाजर खात...

वारा लागला वहायला...
झाडाचं पान न् पान हलायला लागलं...
आभाळात काळा ढग आला...
एकदम लखलखाट झाला...
धमधडाम आवाज झाला, अन् काय झालं, काय ठाऊक?
पण चाऊ लागला पळायला...
पळता पळता, चाऊला माकडानं अडवलं...
पळता पळता, चाऊला माकडानं अडवलं...
माकड :- थांब थांब चाऊ..., काय झालं काय पळायला? वाघ माग लागला, का लांडगा...?
चाऊ :- माकडदादा काय सांगायच, भयानक वादळ आलय, आभाळात काळा काळा ढग आला, एकदम लखलखाट झाला, धमधडाम आवाज झाला, आभाळ फाटल, अंगावर पडल, आता पाऊस पडणार, आपल सगळं जंगल वाहणार...आपण जायला हवं...
माकड :- खरचं का..? चल मग, आपण जाऊ या...
माकड :- खरचं का..? चल मग, आपण जाऊ या...
चाऊ अन् माकडदादा पळायला लागतात, जाताना कावळा, तरस, लांडगा, कासव... एका मागन् एक वाट अडवतात...
काय झालं ऐकतात...
ना बघतात, ना पाहतात...
पळायला लागतात, असं करता करता...
जवळ जवळ सगळ आनंदवनच पळायला लागलं...
मग,अडवलं एका चाणाक्ष गजराजानं...
गजराज :- थांबा....थांबा... का पळताय? काय झालं?
चाऊ :- गजराज काय सांगायच,
भयानक वादळ आलं,
आभाळात काळा काळा ढग आला,
एकदम लखलखाट झाला,
धमधडाम आवाज झाला,
आभाळ फाटलं, अंगावर पडलं,
आता पाऊस पडणार,
आपलं सगळ जंगल वाहणार,
आपण जायला हवं.
गजराज :- काय? भयानक वादळ आल? आभाळ पडलं? असं कसं झालं? दाखव आभाळ !
चाऊ :- गजराज खरचं, आभाळात धमधडाम आवाज झाला, अन् अंगावर आभाळ पडलं...
गजराज :- माकडडदादा, जरा चाऊच अंग बघ, अन् काय पडलय सांग बरं..!
माकडदादाला अंगावर झाडचं पान सापडलं...
आता सगळ जंगल चाऊला हसायला लागलं...
तसा गजराज ओरडला, "आता हसत आहात, पण न बघता पळाला ना...?
खरं तर चाऊ घाबरटच, पण इतरांना बघता आलं असत...?
आता जरा बघत जा...
उगाच घाबरणं अन् इतरांना घाबरवणं बंद करा..."
चाऊ :- गजराज, खरचं मला माफ करा...
आता ना घाबरणार, ना घाबरवणार... !
**********






Very nice
ReplyDeleteमनःपूर्वक आभार
Deleteखुपच छान
ReplyDeleteमनःपूर्वक आभार
Deleteमस्तच
ReplyDeleteमनापासून आभार 💐😊
Deleteमस्तच
ReplyDeleteमनापासून आभार 💐😊
Deleteवा👌👌 खूपच छान
ReplyDeleteमनापासून आभार 💐😊
Deleteछानच
ReplyDeleteमनापासून आभार 💐😊
Deleteछान👌
ReplyDeleteमनापासून आभार 💐😊
Deleteखुपच सुरेख 👌👌
ReplyDeleteमनापासून आभार 💐😊
Deleteमनापासून आभार 💐😊
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete