मास्टर जिनियस आज खूप
म्हणजे खूपच खूष होता.
अहो काय म्हणून का
विचारता ?
गेले अनेक महिने ठरवूनही
जी गोष्ट त्याला जमत नव्हती, ती यावेळी त्याला अगदी
सहज जमली होती. नाही ना समजते अजूनही काही ....
चला जरा डोकवू या
जिनियसच्या घरात.....
" शाब्बास जिनियस ! हेच मी तुला गेल्या वर्षीपासून
सांगायचा प्रयत्न करत आहे, पण म्हणतात ना कान
सोनारानेच टोचावे,
" आई.
" काय गं आई, यावेळी मी करुन दाखवले ना, मग आता तरी कौतुक कर ना माझं. " जिनियस.
" काय करुन दाखवले राजांनी ? कशाचे कौतुक करायचे ?" बाबा.
" हसणार नाही म्हणून promise केले तरच सांगेन," जिनियस.
"नाही हसणार promise ," बाबा.
" या पूर्ण महिन्यात मी शाळा, योगा, computer class यापैकी कुठलेही निरोप किंवा दिलेले काम करायचे विसरलो नाही किंवा
दोन गोष्टी एकत्र आल्यावर माझा गोंधळ गडबड झाला नाही. महत्त्वाचे म्हणजे यासाठी
आईला माझ्यामागे लागावे लागले नाही,' जिनियस.
" अरे वा मस्तच. म्हणजे आई सुटली म्हणायची
बिच्चारी सांगून,
सांगून थकून
जायची...." बाबा.
" थट्टा नाही करणार म्हणाला होता ना ? मग ? ही पण थट्टाच आहे.."
कुरकुरत जिनियस.
" बरं नाही करत थट्टा, पण खरखर सांग हे आई सांगायची की नाही ? तेही इतक्यावेळा की मग तिची चिडचिड तुझी रडारड आणि शिवाय ऐनवेळी होणारी धावपळ...." बाबा.
" हो अगदी मान्य. मी त्यासाठी आईची मनापासून माफी
मागतो. माते, आपल्या सुपुत्राला माफ करावे, आपणास मुद्दाम त्रास देण्याचा आमचा कधीच मानस
नव्हता, पण काही ना काही व्हायचे आणि हे सगळे करायचे हे
ठरवूनही जमतच नव्हते." नाटक करत आईसमोर गुडघ्यावर येत जिनियस.
" उठा...उठा, उशीरा का होईना पण यावेळी तू सगळी कामे छान आणि वेळेवर पूर्ण केली
याबद्दल तुझे अभिनंदन,"
आई.
"अहो पण मला कुणी सांगेल का की हा चमत्कार झाला
कसा?" बाबा.
" त्याचे झाले असे की मी सुटीत एका शिबिराला गेलो
होतो आठवते आहे ना. त्यात आमचा एक खेळ घेतला होता. त्यात आम्हाला काही चिठ्ठ्या
दिल्या होत्या, त्यावर काही कामे दिली होती. त्यातली किमान कामे
दिलेल्या वेळात पूर्ण करणाऱ्याला बक्षीस होते. गंमत म्हणजे एकालाही ते जमले
नव्हते.
मग शिबीर घेणाऱ्या दादाने
असे का झाले ते समजावले,
सगळ्यात आधी त्याने
सगळ्या चिठ्ठ्या उघडल्या. त्यावरच्या कामांची यादी बनवली. त्यातली कोणती कामे आधी
करायला हवी त्यानुसार त्याचा क्रम लावून घेतला. ज्याला त्याने एक छान नाव दिले... Checklist ! हे करताना सोपी कामे आधी घेतली. काम झाले की
त्यापुढे बरोबरची खूण करायची. सगळी कामे झाल्यावर एक स्टार किंवा smily घ्यायचा.
मग आमच्यापैकीच एकाला
म्हणजे मला ती कामे करायला सांगितली. मी सुरुवात केली... गंमत म्हणजे दिलेल्या
वेळेच्याही आधी सगळी कामे झाली.
मग दादाने हे असे एरवीही
होते आणि मग आपण येत असून अनेक गोष्टीत मागे पडतो हे समजावले. तेव्हा मला आईचे
बोलणे आठवत होते.
मी मनात ठरवले यातले काही
घरी सांगायचे नाही तर शाळा सुरु झाली की करुन दाखवूनच शाबासकी मिळवायची," जिनियस.
" अरे वा मस्त ! पण तू नेमकी कसली Checklist बनवली?" आई.
" पहिली म्हणजे..रोज सकाळी उठल्यापासून ते
झोपेपर्यंत करायची कामे, स्वच्छ
दात घासणे, तोंड धुवून दूध पिणे, स्वतःचा कप विसळणे, अंघोळ, कपडे, शाळा, थोडा time pass, घरचा अभ्यास, योगा, माझ्या आवडीचे वाचन आणि मग झोप.
तसेच शाळेसाठी एक छोटी
डायरी बनवली. ज्यात सांगितलेल्या सूचना, प्रोजेक्ट आणि इतर गोष्टी
आठवणीने लिहून घ्यायला सुरुवात केली.
दादाने सांगितल्यानुसार
गरजेनुसार एकेक पूर्ण करुन घेतल्या. त्यामुळे यावेळी शाळेच्या सगळ्या गोष्टी छान
वेळेत पूर्ण झाल्या आहेत.
रोजची कामे अजून तितकी छान नाही होत, थोडी टंगळमंगळ होते आणि आईला आठवण करावी लागते पण तेही लवकरच जमवणार आहे मी," जिनियस.
" हरकत नाही तुला हे का करायला हवे हे पटले हेही
खूप आहे. चला म्हणजे मास्टर जिनियस आता नुसता हुशार नाही तर organised सुद्धा होत आहे. खरोखरच मोठा आणि शहाणा होत
आहे." आईबाबा एकत्र जिनियसला जवळ घेत म्हणाले.
मग काय मित्रानो, तुम्हीही करणार ना checklist आणि करणार ना स्वतःची कामे स्वतः, आईने आठवण न करता आणि तीही वेळेत... यासाठी
सगळ्यांना शुभेच्छा !






No comments:
Post a Comment
suggestions most wlcome