माझ्या प्रिय ... हो प्रियच भक्तांनो,
चला येतो बरं का ....
हो चाललो आहे मी, खरचं चाललो आहे......
यात मला किंवा तुम्हाला कुणालाही वाईट का बरे वाटावे ?
जाण्यासाठीच तर आलो होतो ना मी ..
थांबलो नेहमीसाठी तर माझे "अतिपरीचयात अवज्ञा" व्हायचे.....
थांबलो नेहमीसाठी तर माझे "अतिपरीचयात अवज्ञा" व्हायचे.....
10 दिवसांसाठी आलो ,बदल छान होता.
मखरात थाटात विराजमानही झालो, प्रसादाच्या वैविध्याने तृप्त झालो. तुमचा आनंद ,उत्साह अनुभवला त्यात सहभागही घेतला.
दुःख , गाऱ्हाणी , इच्छा समजून घेतल्या त्या स्वतःमध्ये साठवल्या आता त्यावर काम करायला नको का ?

आणि सगळ्यात महत्वाचे तुमच्यासाठी दहा दिवस मूर्त स्वरुपात विराजमान झालो पण जाण्यातून हे सांगायचे आहे की हे माझे खरे रुप नाही मी जातो आहे ते फक्त तुम्ही प्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीच्या स्वरुपात पण तुमच्या आतलं माझं स्थान सदैव असणारच आहे .
तुमच्या मधला मी एकदा का तुम्हाला सापडला की समोरच्यामधला, इतर जीवमात्रामधला,अणू रेणू मधला मी जागोजागी भेटणारच आहे .
तुमच्या मधला मी एकदा का तुम्हाला सापडला की समोरच्यामधला, इतर जीवमात्रामधला,अणू रेणू मधला मी जागोजागी भेटणारच आहे .
त्याचे विसर्जन मात्र चुकूनही करु नका....
मला तुमच्या मनामनांत विराजमान करा. तुमची कृती मी करतो आहे याच विचाराने घडू दे !
माझे आणि तुमचे अस्तिव पाण्यात साखर विरघळवी तसे एकरुप होऊ दे !
हा शुभाशीर्वाद !!
तुमचा लाडका बाप्पा ..
असेच तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे !
गेले दोन दिवस माझे अनेक मित्र, हितचिंतक मला एक संदेश पाठवत आहेत.......
जर हे जमले तर मी मूर्ती घरात, मंडळात न आणता वा पूजनही न करता तुझ्या निर्गुण निराकार आदितत्वाताची प्रतिष्ठापना नक्की केली.
मला तुमच्या मनामनांत विराजमान करा. तुमची कृती मी करतो आहे याच विचाराने घडू दे !
माझे आणि तुमचे अस्तिव पाण्यात साखर विरघळवी तसे एकरुप होऊ दे !
हा शुभाशीर्वाद !!
तुमचा लाडका बाप्पा ..
प्रिय बाप्पा ,
गेले दोन दिवस माझे अनेक मित्र, हितचिंतक मला एक संदेश पाठवत आहेत.......
प्राणप्रतिष्ठा....विसर्जन
खरं तर तो कुठेच जात नाही, इथेच असतो. प्रतिष्ठापना, विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ.
अनादी, अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्यांना आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार?
गणेश, महादेव ही तत्त्वं आहेत सृष्टीतली. विसर्जन माणसांचं असतं आपल्यासारख्या. तत्त्वं चिरंतन असतात.
वि. दा. सावरकर.
हा संदेश खूप ठिकाणाहून आला. वाचून पटलासुद्धा.
ज्यांच्या नावाने आला त्यांच्या केसाइतकाही पात्रता माझ्यात नाही तरी खूप वेळा वाचून यावर काय बरं म्हणावं असे वाटून गेले आणि जे सुचले ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते,
प्राणप्रतिष्ठा
या उत्सवाच्या निमित्याने का होईना काही चांगल्या गोष्टींची सुरुवात , प्रतिष्ठापना मी करु शकते का?
चांगले विचार, कृती करु शकेन का?
जर हे जमले तर मी मूर्ती घरात, मंडळात न आणता वा पूजनही न करता तुझ्या निर्गुण निराकार आदितत्वाताची प्रतिष्ठापना नक्की केली.
विसर्जन
ते आदितत्व माझ्यात आहे पण मी पूर्णपणे त्याला अनुभवू शकत नाही कारण इतर अनेक विकारही माझ्यात आहेत.
मग या विकारांचे विसर्जन या निमित्याने मला करता येतील का? तर ते मी जरुर करेन.
आणि अशा विचारातून माझ्या भारतीय परंपरा व संस्कृतीने जे अनेक विविध सण समारंभ मला दिले त्यातून मला घडवण्याची संधी मला मिळत राहो.
मला अनादी अनंत आदितत्व असलेले तुझे निराकार रुप अनुभवता यावे ही मनापासून इच्छा.
याच विचाराने तुझ्या मूर्त रुपाचे विसर्जन काल आम्ही केले.
तू माझ्यासोबत आहेच पण तुझे अस्तित्व मला पांगळे बनवणारे होऊ नये म्हणून जाण्याचे असे भास तू निर्माण करतो इतकेच मला वाटते.

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome