गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमेच्या निमित्याने गुरु या शब्दाचा आजच्या पिढीला अर्थ कळवा म्हणून ही कथा.
माझा मुलगा गंधार याला स्पर्धेसाठी गुरु शिष्यांची गोष्ट हवी होती त्यनिमित्याने केलेले हे लेखन.गोष्ट इंग्लिश मधे सांगितली होती पण येथे मराठीतही देत आहे.
प्रसंग स्वामी विवेकानंदांच्या बालपणीचा आहे. त्यातून गुरु ही संकल्पना शोधायचा प्रयत्न केला आहे.
प्रयत्ननाचे यश की स्पर्धेत पहिले बक्षीसही मिळाले होते.
Good morning respected guests, teachers & my dear friends.
My Today's story for gurupournima is related to Svami Vivekananda.
One day svamiji was in Varanasi. He was going somewhere. On that road there were so many monkeys which were not allowed svamiji to walk on road. Svamiji frientend and started running fast. But monkeys equally ran fast and started pulling his legs. Svamiji fell down and could not escape from those nagughty monkeys.
Just that time a person was watching all these said to svamiji," Don't run my son, attack on them."
Svamiji did same. He stood facing monkeys with stick in hand, seeing this monkeys ran away.
From that day svamiji learned that whatever is fearful,be strong & face it. Face difficulties ,it will run away like those monkeys.
In short not only teachers teach us but experiences also teach a lot
उपस्थित गुरुजन आणि माझ्या बालमित्रांना सादर प्रणाम!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
शाळेत अगदी खेळगटाच्या पहिल्या दिवशीपासून मी हा श्लोक म्हणतो आहे.मी आईला विचारलं आई गुरु म्हणजे काय तेव्हा ती म्हणाली," बरं का गंधार जे कोणी आपल्याला काहीतरी चांगल शिकवतात ते सगळे गुरु. घरात आई ,बाबा,आजी, आजोबा तर शाळेत तुमच्या ताई,मावशी सगळे गुरुच इतकंच काय पण तुझी छोटी बहीण नभा पण.
मी म्हणलं काहीपण काय नभा मला काय शिकवणार?
मग आईने मला एक गोष्ट सांगितली तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे.गोष्ट जरा वेगळी आहे.
तर ही गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांची.स्वामीजी तेव्हा लहान होते.सगळे त्यांना नरेंद्र म्हणून ओळखायचे.
एकदा नरेंद्र वाराणसीला रस्त्यावरुन चालला होता.त्या रस्त्यावर खूप माकडे होती.माकडे नरेंद्रला रस्त्यावरुन जाऊ देईना, घाबरुन तो जोराने पळू लागला तशी माकडेही पळू लागली. एकाने त्याचा पाय ओढून त्याला खाली पाडले.
हे दृश्य जवळच उभे असलेले एक आजोबा बघत होते. ते नरेंद्रला म्हणाले,"बाळा घाबरु नको, त्या माकडांचा सामना कर.घाबरलास तर ते तुला जास्त त्रास देतील."
हे ऐकून नरेंद्रला धीर आला.तो उठून उभा राहिला.त्याने शेजारी पडलेली काठी उचलून, माकडांवर उगारला ,घाबरुन माकडे पळून गेली.
हा प्रसंग सांगताना स्वामीजी म्हणतात, त्या अनोळखी आजोबांमुळे मी शिकलो की संकटाना घाबरुन पळून जाण्यापेक्षा त्यांचा सामना करायला हवा आणि प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकायला हवे.
म्हणजे काय तर, फक्त शिक्षक नाहीतर प्रसंग ही आपल्याला शिकवत असतात.कधी आपण दुसऱ्याला मदत करायला शिकतो तर कधी नवे काम करायला.
शाळेतल्या ताई ,आई,बाबा,मोठी माणसे जसे चांगल वागायला शिकवतात तसेच लहान भावंड सगळं विसरुन हसायला शिकवतात. इतकंच काय पण मुंगी,मधमाशी सतत काम करायला शिकवतात,पक्षी छान किलबिल शिकवतात,नदी झाडे दुसऱ्यासाठी जगायला शिकवतात म्हणजेच सगळा निसर्गही आपल्याला काहीना काही शिकवत असतो फक्त आपण शिकण्यासाठी तयार असायला हवे आणि या सगळ्यांचा आदर करायलाही शिकल पाहिजे तरच गुरु म्हणजे काय ते आपल्याला समजले असे म्हणता येईल.
तर अशा या सगळ्या गुरुंना मी मनापासून नमस्कार करतो आणि नेहमी शिष्य बनून रहाण्यासाठी मी सगळ्यांच्या शुभेच्छा मागतो आणि माझी छोटीशी गोष्ट संपवतो.
*********************************
प्रेरणादायी कथन ! 👌👌
ReplyDelete