ज्या शाळेत माझे शिक्षण झाले ती ज्ञानप्रबोधिनी, ज्यांनी कृतीतून संस्कार रुजवले ते आई-बाबा, यांचे आधी अनुकरण आणि नंतर स्वानुभव यामुळे मी स्वतः नित्य उपासना करते...
ज्याचा लाभ नेहमीच मिळत असतो...
पण काही वर्षांपूर्वी उपासनेचा उपयोग व्याधी मुक्तीसाठी होतो याचा अनुभव घेतला होता...
मागची दोन वर्ष सारे जग एका विचित्र परिस्थितीतून, वातावरणातून, मुद्दाम वा अचानक आलेल्या महामारीच्या फेर्यातून जात असताना, मी पुन्हा अनेक प्रसंगात या उपासनेचा भक्कम आधार अनुभवला...
माझ्यासोबत इतरांनीही तो अनुभव घ्यावा, म्हणून हा लेखन प्रपंच
आपल्या भारतीय संस्कृतीत देव किंवा चराचरात भरून राहिलेल्या शक्तीला प्रणाम करायचा, वंदन करायचे आणि मग आपले काम करायचे हे खूप लहान वयापासूनच बिंबवले जाते, सांगितले जाते आणि यालाच उपासना म्हणता येऊ शकते...
मग कोणी जप करेल, कोणी श्लोक मिळेल, कोणी पूजा-अर्चा करेल...
यात सर्वात कृती महत्त्वाची नाही, तर त्यामुळे मिळणारे समाधान, शांतता आणि पुढे जाऊन मिळणारे सामर्थ्य महत्त्वाचे आहे...
आपण सगळेच हे जाणून आहोत...
पण या सामर्थ्याचा किंवा समाधानाचा उपयोग व्याधी मुक्तीसाठी कसा होतो, याचा अनुभव मी स्वतः काही वर्षांपूर्वी घेतला...
दैनंदिन गोष्टी करताना अनेक अनुभव आपल्या कामावरती, मनावरती परिणाम करत असतात...
जसा आपल्याला आनंद होतो, तसेच अनेक गोष्टींचे वाईट वाटते, भीती मनात घर करते आणि मग त्यातूनच मानसिक, शारीरिक आजार पाठीमागे लागतात...
असाच काहीसा अनुभव तेंव्हा आला होता...
एक विचित्र प्रसंग घडला, ज्याचा इतका खोल आघात झाला की, मनावर सतत एक ओझे जाणवू लागले, कशातच लक्ष लागेना, प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची...
भूक हरवली, मुद्दाम खाल्ले, तरी त्याचे समाधान मिळायचे नाही, झोपेवरही परिणाम झाला आणि मग सगळं शरीरावर दिसू लागले....
सतत डोकं दुखणं, अंग दुखणं, कणकण वाटणं ही लक्षणे, परिणाम सतत उदासी वाटणे, वजन कमी होणे, अचानक रडू येणे, एक ना अनेक...
या सगळ्यामागचे कारण माहिती असल्यामुळे, यावर औषध घेऊन फायदा होणार नाही तर घडलेला प्रसंग, त्यामुळे निर्माण झालेली भीती यावर काम करायला हवे, हे आईच्या लक्षात आल्यामुळे, तिने एक पुस्तक मला वाचायला दिले...
ज्ञानप्रबोधिनीचे आद्य संचालक कै. आप्पा पेंडसे यांनी अनुभवाधारित लिहिलेले पुस्तक...
पुस्तकाचे नावच आहे, उपासनेतून व्याधीमुक्ती...
पुस्तकातून आप्पांनी कोणताही आजार शरीराला होण्यापूर्वी मनाला कसा होतो, आणि नंतर शरीरावर कितीही उपचार केले तरी जोपर्यंत तो मनातून जात नाही, तोपर्यंत त्यातून बाहेर पडता येत नाही...
यावर अतिशय सहज, सोप्या भाषेत, तेही प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगातून मांडले आहे...(सत्य कथांवर आधारित)
आप्पा स्वतः होमिओपॅथी डॉक्टर असल्यामुळे, त्यांनी औषधोपचार नाकारलेले नाही, पण त्यासोबत जर उपासनेची जोड दिली तर, त्या व्याधीतून आपण स्वतःचे स्वतः कसे बाहेर येतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे...
उपासनेतून व्याधीमुक्त होण्यासाठी, अतिशय शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवली आहे...
पुस्तकाचे पूर्ण वाचन केल्यावर आप्पांनी सांगितलेल्या कृतीवरती मी काम केले, आणि त्रासदायक असणाऱ्या त्या प्रसंगातून अगदी मी सहज बाहेर आले...
प्रसंग विसरला नाही, आजही तो जशाचा तसा आठवतो पण, आता त्याचा कोणताही परिणाम माझ्या मनावर किंवा शरीरावर होत नाही...
आज हे आठवण्याचे किंवा सांगण्याचे कारण...
आपण रोज, काही ना काही नकारात्मक ऐकत असतो, बघत असतो, किंवा प्रत्यक्ष अनुभवत असतो, त्याचे काही ना काही परिणाम आपल्या आधी मनावर आणि नंतर शरीरावर होतात, जे धोकादायक आहे...
यातून जर आपल्याला सहज बाहेर पडायचे असेल तर प्राथमिक उपाय...
योग्य-पुरेसा-पौष्टिक आहार, व्यायाम आणि व्यवस्थित झोप आणि या सगळ्यासोबतच...
अत्यंत महत्त्वाची गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे नित्य उपासना...
आप्पांनी सुचवले आहे, त्यानुसार उपासना कोणती, कोणाची, किती वेळ हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतः ठरवावे, आणि मग न चुकता, कंटाळा न करता ती उपासना रोज करावी...
अर्थातच मग त्याचे सामर्थ्य अनुभव मिळाल्याशिवाय रहाणार नाही...
मी स्वतः रोज उपासना करतच होते, करते आहे आणि नित्य करेनच, पण माझ्यासोबत तुम्हीही यात सहभागी व्हा...
परिस्थिती कशीही येवो, त्याला संयमाने सामोरे जाण्यासाठी, उपासना नामक शस्त्र- अस्त्राने अधिक सक्षम होऊ या...
Eye opener!!
ReplyDeleteखुप छान👏✊👍
DeleteThanks a lot💐
Deleteपूर्ण सहमत 🙌🏻...
ReplyDeleteप्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 💐
Deleteसुंदर आणि प्रामाणिक अनुभव कथन केले आहे... blog आवडला
ReplyDeleteमनःपूर्वक आभार !
Deleteलेखनाची आवड, छंद तर आहेच पण चल उपासनेचा अनुभव पण आहे.
मनातील विचार योग्य शब्दात लेखनरुपाने बाहेर पडले की एक प्रकारची स्वस्थता शांतता मिळते.
http://abhigandhashali.blogspot.com
DeleteIts blog link
उपासनेच महत्व खूप छान शब्दात मांडले आहे आदरणीय अप्पांचे पुस्तक ही वाचायला हवे
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 💐
Deleteपुस्तक मिळवून जरुर वाचा..,
कारण प्रत्येकाला वेगळा संदर्भ सापडत जातो..
ब्लॉग आवडला... सुंदर रेखाटन... उपासना कोणती किती वेळ याचे स्वातंत्र्य पण उपासना आवश्यक... अगदी खरं....
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 💐
Deletehttp://abhigandhashali.blogspot.com
Its blog link
आपल्या प्रबोधिनीच्या उपासनेमुळे मानसिक,शारीरिक, भावनिक व बौद्धिक दुर्बलता कमी होण्यास आणि सामर्थ्य वाढण्यास नक्की मदत होते याचा अनुभव मलाही येतो आहे.
ReplyDeleteअगदी नक्की पण अनुभव मिळण्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वतः करून बघावी लागते..
Deleteप्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 💐
http://abhigandhashali.blogspot.com
Its blog link
सहमत,उपासनेचे खूप लाभ आहेत
ReplyDeletehttp://abhigandhashali.blogspot.com
DeleteIts blog link इतर लेख वाचण्यासाठी..
नक्कीच. सातत्याने केलेल्या उपासनेचे खूप लाभ आहेत
ReplyDeleteउपासनेमुळे मिळणारे मानसिक, शारीरिक आरोग्य इतकेच नव्हे तर आजार त्यावर आपोआप होणारे उपचार खरोखरच अदभुत आहेत पण त्यातील नियमितता आणि सातत्य खुप परिणाम कारक अन आवश्यक आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteमी ही हेच अनुभवल आहे आणि म्हणूनच अजूनही उपासना सुरु आहे
ReplyDeleteप्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 💐
DeleteKhop Chan...
ReplyDeletehttp://abhigandhashali.blogspot.com
DeleteIts blog link इतर लेख वाचण्यासाठी..
Excellent
ReplyDeletehttp://abhigandhashali.blogspot.com
DeleteIts blog link इतर लेख वाचण्यासाठी..
Vey nice
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 💐
Deletehttp://abhigandhashali.blogspot.com
Its blog link इतर लेख वाचण्यासाठी..
प्रेरणादायी लेख ! सुंदर संदेश !!! 👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 💐
Deletehttp://abhigandhashali.blogspot.com
Its blog link इतर लेख वाचण्यासाठी..
This comment has been removed by the author.
ReplyDeleteप्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 💐
ReplyDeletehttp://abhigandhashali.blogspot.com
Its blog link इतर लेख वाचण्यासाठी..
http://abhigandhashali.blogspot.com
ReplyDeleteIts blog link इतर लेख वाचण्यासाठी..
http://abhigandhashali.blogspot.com
ReplyDeleteIts blog link इतर लेख वाचण्यासाठी..
http://abhigandhashali.blogspot.com
ReplyDeleteIts blog link इतर लेख वाचण्यासाठी..
नियमित उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित राहण्यास मदत होते. 🙏
ReplyDelete