बरोबर दोन महिन्यांपूर्वी
रविवार १६ मे २०२१
रोजी पुणे-मुंबई जुना महामार्ग नाशिक फाटा ओलांडल्यावर येणाऱ्या,
शेल पेट्रोल पंपासमोर माझा अपघात झाला,
काही कळायच्या आत, गाडीवरून फेकला गेलो....
डावा हात आणि पाय दोन्ही जखमी झाले...
जागेवरून उठताच येत नव्हते...
समोरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाने धडक दिली होती...
चालवणारा मुलगा अल्पवयीन आणि नशेत होता,
सोबत एक मित्र आणि मैत्रीणही होती 😷...,
मदतीला जमलेल्या मंडळींनी तिघांना जाम चोपयला सुरुवात केली...
इकडे मी बायकोला आणि एका मित्राला कळवले...
आम्ही आल्याशिवाय कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊ नको, असे त्यांनी बजावले...
मग करणार काय...?😎
माझी स्वारी समोरील तमाशा बघण्यात गुंग झाली...
कुणीतरी पोलिसांना बोलावून घेतले,
त्यानंतर सुमारे चाळीस मिनिटे,
माझी काहीही चूक नसताना झालेला,
मनस्ताप मी गमतीत बघत होतो... 😐😑😶
मनात आले, कदाचित गजानन महाराजांना काहीतरी नवे समजावून सांगायचे असेल...
(जीवनशिक्षण😇)
घरचे ❤️, शेजारचे 💙, मित्र 💛 आणि पोलीस सगळे एकत्रच पोहचले...
एकीकडे कायदेशीर कारवाई सुरू झाली,
तिथे शेजारचे राहुल- स्वप्नील (जे खरंतर वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत)
आणि मित्र राहुल -समीर थांबले... काय- कसं-कोणी-केंव्हा झाले इ. चौकीशी,
पोरांना हाणामारी सुरु होती, चौकीत जमा झाल्या...
आणि दुसरीकडे माझी स्वारी ..
बायको आणि चुलत भाऊ यशवंत यांच्यासोबत
दिवाण अर्थो स्पेशल दवाखान्यात रवाना झाली...
हा योग्य निर्णय माझी वहिनी डॉ. दिपाली
(डॉ. अनिरुद्ध टोणगावकर यांची पत्नी ) हिच्या सांगण्यावरून घेतला,
कारण तेंव्हा कोविडमुळे हेवी लॉक डॉऊन चालू होते,
आणि असेही आपण दवाखाना-डॉक्टर या बाबतीत अनभिज्ञच असतो...
(योग्य दवाखाना, डॉक्टर या अशावेळी खूपच महत्त्वाच्या गोष्टी असतात)
दवाखान्यात पोहचून, एक्सरे काढल्यावर खरे चित्र समोर आले,
दुखापत खूप मोठी आहे हे स्पष्ट झाले...😓
मग डॉक्टरांच्या रुपात गजानन महाराजांनीच माझा ताबा घेतला...
प्राथमिक उपचार, वेदनाशामक 💉 💊
सोबतच मला शांत ठेवणं, धीर देणे सगळं चालू होते...
मित्र राहुल-समीर, भाऊ नरेंद्र-यशवंत, वहिनी वैभवी,
आणि बायको (माझी😇) असे आजूबाजूला होते...
प्रश्न विचारत होते... बोलत होते... काहीतरी ठरवत होते...
मला दिसत होते पण, तेंव्हा समजण्याच्या पलीकडे होतो... 😵
दुसऱ्या दिवशी दुपारी दोनला ऑपरेशन करायचे ठरले...
कारण पायावर भयंकर सूज होती आणि डॉ. दिवाण त्यावेळी प्राधिकरणमध्ये नव्हते...
ऑपरेशनसाठी आवश्यक पूर्वतयारी, एन ओ सी इ.
गोष्टींची पूर्तता रात्रीच झाली होती, तेही एकही नवा पैसा न भरता...
बायको आणि यशवंत सोडून इतर सर्व घरी परतले...
रात्री साधारण दीडच्या सुमारास भयानक वेदना झाल्यामुळे (Pain attack)
पुन्हा डॉक्टरांचे आपसात मेसेज होऊन,
ऑपरेशन दुपार ऐवजी सकाळीच करायचा बदल झाला...
💔 सोमवार १७ मे २०२१ 💔
सकाळी सकाळी ८ ला ऑपरेशनची तयारी सुरु झाली...
सगळं पूर्ण पार पडायला १०.३० वाजले...
भूल संपूर्ण नसल्याने, काय चालू ते थोडेफार कळत होते...
ओ.टी. असिस्टंट सूरजने मला डाव्या पायाच्या घोट्याला,
दोन्ही बाजूंनी चढवलेले प्लेटचे दागिने
आणि डाव्या हातात घातलेली के वायर याची सविस्तर माहिती,
टीव्ही स्क्रीनवर दाखवत समजावून सांगितली... 😨😕
आलीया प्रसंगा...म्हणत सज्ज झालो.. पुढचे चार दिवस, मी स्वतःचे लाड करून घेणे चालू केले...
प्रत्यक्ष दवाखान्यात डॉक्टर, नर्स, मावशी, सगळा स्टाफ,
२४ तास सेवेला होताच.. शिवाय बायको, यशवंत, वैभवी सुद्धा...
(कोव्हिडमुळे गर्दीला परवानगी नव्हती, 👨👩👦👨👩👧👧आई-बाबा, नरेंद्र, गंधार-नभा वहिनी, सासू-सासरे, आणि मित्र ❣️ यांच्याशी 📱व्हिडीओ संवाद सुरु होता)
सर्व उपचार, दिवाण डॉक्टरांची रोजची फेरी, फिजिओ सगळं चालू होते...
तिसऱ्या दिवशी काही दिवसांसाठी का होईना, अजून एक नवा अलंकार ... क्रचेस (कुबड्या कारण हातालाही दुखापत होती, त्यामुळे वॉकर चालणार नव्हता) मिळाला, ते वापरण्याचे पाच /चार/ तीन स्टेप ट्रेनिंग पण मिळाले....
या दिवसात पोलीस, FIR, इन्शुरन्स अशा अनेक गोष्टींचे निर्णय घ्यावे लागले, त्यात त्या-त्या ठिकाणी काम करणारी, पण चांगल्या वागणुकीमुळे वेळ प्रसंगी ओळख झालेली मंडळी मदतीला धावली...
त्यामुळे मला किंवा बायकोला फार लक्ष घालावे लागले नाही...
एफ आय आर संदर्भात दवाखान्यात देसाई सर..
आणि नंतर पोलिस चौकीत गौरव (बायकोचा छोटा बंधू) याची खूप मदत झाली...
शुक्रवार २२ मे २०२१
दवाखान्यातून घरी आलो... येताना डॉक्टरांनी भरपूर सूचना दिल्या...
त्यात महत्त्वाची म्हणजे सांगत नाही, तोपर्यत डावा पाय टेकवायचा नाही...
इतके दिवस सलाईन आणि वेदनाशामक गोळ्यांचा मारा चालू असल्याने,
खरं दुखणं अजून माहितीच नव्हतं... 💘
औषधांचा मारा कमी झाल्यावर हळूहळू कळायला लागले....
सोमवार २५ मे २०२१
परत एकदा ड्रेसिंगसाठी जाऊन आलो...
जखम बरी होत होती, पण वेदना ब्रह्मांड दर्शन देत होत्या...😨
रात्री तर अशक्य दुखायचे, ज्यावर उपाय एकच..... महाराजांचा धावा... जमेल तसा, सुचेल तसा...
बायको आणि मी 👩❤️👨 रामरक्षा, येतील ती सगळी स्तोत्र, जप करत रात्र कशीतरी संपवायचो..
चालू वेदनाशामक औषधांचे दुष्परिणाम दिसायला लागले आणि त्यावर पुन्हा एकदा महाराज वैद्य मेधाताईच्या (देवळेकर) रुपात आयुर्वेदिक 🌿🌱🍃 चिकित्सा 💛घेऊन मदतीला धावली...
पुड्या-काढे-तेल-तूप-भस्ती एक ना अनेक गोष्टी... ज्यामुळे खूप उपयोग झाला... आराम मिळायला लागला आणि महत्वाचे वेदनाशामक गोळ्या पूर्ण बंद झाल्या... 💊❌
या सगळ्यात लहानपणी गंधारची केलेली तेल मालिश, घुटी... लाड आठवत होते आणि आपलेही तसच सगळं चालू आहे, असेही वाटत होते...
नाही म्हणलं तरी, नवा जन्म झालाच ना... 💓
💜 शुक्रवार २८ मे २०२१ 💜
मग बारा दिवसांनी टाके (२४ स्टेपलर पिना - ज्या घरी आणून जपून ठेवल्या आहेत) काढून प्लास्टर घातले...
जशी जशी जखम बरी होत होती, प्लास्टरच्या आतून जाम खाज सुटू लागली, मग जे मिळेल ते घेऊन (कागद, कंगवा, पट्टी) खाजवायचो...
ते लागून जखम होईल, या काळजीने घरचे ओरडायचे... 😷 बोलणी खाऊ लागलो आणि तरीही गुपचूप पुन्हा पहिले पाढे पंचावन्न....
त्यांना काय जात होतं ओरडायला, त्रास मला व्हायचा...😎😬
💜 बुधवार ९ जून २०२१ 💜
२१ दिवसांनी हातामधली के वायर काढली
(वायर कसली चांगला १० से.मी वाकवलेला खिळा... तोही घरी आणला आहे... 😝)
मग त्या हाताला दिवसातून किमान दोनदा जमलं तर चार वेळा आयुर्वेदिक तेलाचा मसाज, धारा याला सुरुवात झाली...(हे आई किंवा बायको, कधीतरी गंधार करायचे) सोबत भस्ती, पोटातून औषधही सुरू होतीच....
परिणामी हाताची सूज खूप लवकर , कमी होऊन, त्याची हालचाल पूर्व पदावर येऊ लागली....
हळूहळू का होईना प्रगती होत होती... 💖
या सगळ्यात मी पूर्ण वेळ आमच्या घरातल्या वरच्या मजल्यावरच्या रुममध्ये होतो...
आवश्यक गोष्टी सोडता शंभर टक्के आराम चालू होता... 😴😴😴
मध्ये एकदा उगाच पायाचे प्लास्टर हलले, त्यामुळे बहुतेक प्लेट पण हलली असे वाटून दवाखान्याची खेप झाली...😰
शंका मला वाटली, पण धावपळ आई, बायको, गंधार आणि आमचे बाबू काका यांना करावी लागली...
तिथे जाऊन डॉक्टरांचा असं काही होत नसतं, रिकामे डोके सैतानाचे 😈 घरं झाले आहे आणि त्यामुळे नको ते विचार करतो आहेस...जरा थोडी घरातली काम करा, असा शब्दांचा खाऊ घेऊन घरी आलो...
डॉ. रागावले म्हणून रुम मधून बाहेर पडू लागलो... अधूनमधून भाज्या चिरु 🔪लागलो...
समोरच्या चिमुरड्या राजवीर, रुही सोबत गप्पा, दंगा मस्ती...
इकडे बायकोने एक वेगळीच थेरपी सुरु केली, ती म्हणजे सतत सेवेला रहाणे कमी करुन, मी माझी कामे करावीत, हे येन तेन प्रकारे नुसते सुचवले नाही, तर करायलाही लावले...
स्वतःची काही कामे करायला सुरुवात तर केली, जसे औषधे स्वतः घेणे, अंघोळ स्वतः करणे इ. त्याबरोबरच हाताला किमान एकदा माझा मी मसाज करायला लागलो...
तरी अधूनमधून पायाकडे लक्ष जायचेच,
२९ जून २०२१
पायाचे प्लास्टर काढले,
दोन पाय दोन वेगळ्या व्यक्तीचे आहेत असे वाटावे इतका रंग (नभाचे निरीक्षण काकाचा एक पाय खूप काळा झालाय)आणि आकारात फरक पडला होता...
( डावा पाय प्रचंड बारीक झाला होता... असेही १०-१२ किलो वजन उतरले, ते बऱ्यापैकी पायावर जास्त जाणवत होते) 😔😟
पायासाठी पाच प्रकारचे व्यायाम प्रकार, डाव्या पायावर पन्नास टक्के भर देऊन चालण्याची, पाऊल टाकण्याची पद्धत दवाखान्यातील फिजिओथेरपीस्टने शिकवले...
हात ऐंशी टक्के बरा झाल्याने आणि पाय टेकवण्याची परवानगी मिळाल्याने, आता अधूनमधून वॉकर घेऊन चालत होतो...
दिलेले व्यायाम करत होतोच, पण तरी कदाचित माझ्यावर महाराजांचे माझ्याकडे माझ्याहूनही जास्त लक्ष होते.....❣️
म्हणूनच बायकोच्या सध्याच्या, सिटी प्राईड शाळेतील विद्यार्थी अनय शहा याची आई, ज्या फिजिओथेरपीस्ट आहेत यांच्याशी अचानक परिचय झाला...💛💛💛
त्यांनी मला पूर्ववत करण्यासाठी स्वतःहून फोन, मेसेज केले...
प्रत्यक्ष भेटायला यायची तयारी दाखवली...
५ जुलै २०२१ बुधवार
मग आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो, त्यांनी खूप सोपे व्यायाम आणि भरपूर प्रकार दिले, अगदी वजनाच्या पिशव्या बांधून करण्याचे सुद्धा, हे सगळे फक्त पायासाठीच नाही तर एकूणच पहिल्या सारखे चालण्यासाठी, जी ताकद वाढायला हवी त्या सगळ्यासाठी...
शिवाय त्यांचे अनुभवी बोलणे, विश्वास देऊन गेले की मला फार काहीच झालेले नाही, फक्त गरज आहे थोडे दिवस आराम, व्यायाम, योग्य आहार सांभाळण्याची... आणि आनंदी रहाण्याची...
टीचर घरी आल्या म्हणूनच रॉयल ट्रीटमेंट मिळाली...अनयची आजी, बाबा, काका-काकू, भावंड सगळ्यांशीच गप्पा झाल्या... भरल्या गोकुळातून नवीन उर्जा घेऊन परतलो... 💓💓💓
अर्थात त्यामुळे प्रगतीत खूपच जलद होत होती...
आता पायासाठीही मेधाताईचे आयुर्वेदिक मसाज, तेलाची संतत धारा शिवाय भस्ती, पोटातून औषधे सुरु झाली...🌿🌱🍃💖 एकत्रित परिणाम दिसत होताच...
मध्ये एक दिवस दोन क्रचेस ऐवजी, एकच घेऊन चालून बघितले आणि सगळ्यांना सरप्राईज दिले...
२९ जूनला डॉक्टर म्हणले होते की पंधरा दिवसांनी फॉलोअपला ये, तेंव्हा कोणत्याही सपोर्टशिवाय चालायला शिकवीन...
❤️गुरुवार १५ जुलै २०२१ ❤️
त्यादिवशी मी आणि बायको दवाखान्यात उशिरा गेल्याने खूप गर्दी होती,
तिथल्या सर्वांची धावपळ बघत होतो...
नंतर नंबर आल्यावर त्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो...
दिवाण डॉक्टर आले..." काय कसा आहेस? कशाला आला? आज काय करणार सांगितले होते? "
एकामागून एक प्रश्न ... आम्ही जमतील तशी उत्तरे...
" बरं आधार न घेता, चालायला शिकवायचे ना... चल ये इकडे, चालून दाखव"
😟माझे हात अर्थात वॉकरकडे जाणार तोच....
" कशाला हवा वॉकर, चाल तसाच ..."
😨जमतय कुठे...
" चल मला धर मला... इतकं कशाला वजन माझ्यावर... कमी कर... अजून कमी कर... अजून... आता कसं... चाल आता..."
मी नुकत्याच चालायला लागलेल्या बाळासारखी चार पावलं टाकली, तेही धरुन धरुन...
" बस आता, कळलं ना, तुला काहीही झालेले नाही, पूर्ण बरा झाला आहेस, फक्त अजून थोडी भीती आहे... आता नो क्रचेस, नो वॉकर हातात छोटी काठी चालेल... फक्त लक्षात ठेव वाकड, लंगडत चालायचे नाही... (बायकोकडे बघून चालला तर मारायचे पायावर😳😉) पुन्हा ये १५ दिवसांनी..."
येताना आईसक्रीम 🍨 पार्टी करुन घरी आलो...
माझं मी ठरवून कोणताच आधार न घेता, दहा पावलं चाललो...
काय जबरदस्त अनुभव होता माहितीये... (बचना ऐ हसिनो...😝)
लहानपणी पहिल्यांदा चाललो, ते तर आठवत नाही, पण तेंव्हाही इतका आंनद झाला नसेल... इतका खुश होतो... 😊💗
फक्त मीच नाही तर ते सगळे ज्यांना मी माझे आहेत असं म्हणतो ते सगळेच खूष होते... 💕💞
हळूहळू सगळं पूर्व पदावर येत आहे... आणि सगळं आधीपेक्षाही छान होणार आहे याची खात्री, विश्वास आहे...
बायकोला म्हणलो, " गुरुवार आहे, चल गजानन महाराजांना जाऊन येऊ...!"
पण मंदिर सध्या बंद...
ती म्हणाली, "ते गाणं माहितीये ना...
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी...
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई...
सध्या महाराज मंदिरात आहेत कुठे...?
मंदिरात जाऊन कुणाला भेटणार..?
ते आपल्या सोबत होते, असतात, आणि असणार आहेत..."
खरं या दोन महिन्यात खूप गोष्टी बघितल्या, अनुभवल्या, शिकल्या...
रिकामा अर्धा पेला.... काही दुखलं, चुकलं, हरवलं...
पण ते सगळं भूतकाळात सोडून देणार...
यात चुकून कुणाला कळवायचे राहिले असेल, कुणावर चिडचिड झाली असेल तर क्षमा मागतो...
आणि भरलेला अर्धा पेला... नवीन माणस जोडली गेली...💛💛
प्रेमाच्या माणसांची वेडी माया अनुभवली....❣️❣️❣️
त्यांना माझ्या वेदना अनुभवताना बघितले....😓😓😓
माझ्यावरचा विश्वास सतत सगळ्यांच्या डोळ्यात पाहिला...😍
सगळ्यांसोबत मी, मला फार काहीच झालेले नाही, म्हणत दोन महिने जणू आनंदोत्सवच केला, फक्त जरा वेगळा आहे...
यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोबत असलेल्या साऱ्यांचे आशीर्वाद, प्रेम, आणि शुभेच्छा याच्या कायम ऋणात राहायलाच आवडेल....💗💗💗
असे प्रसंग खूप संपन्न, कणखर, भावुक, समृद्ध बनवत असले,
तरी कुणाच्याही वाट्याला कधीही न येवो, ही प्रार्थना महाराजांना करतो आणि थांबतो...
अभिजित डेंगवेकर...
( लेखन पारंगत नसल्याने, शब्दांकन करायला बायकोची मदत घेतली आहे)
************************
























शुभेच्छा
ReplyDeleteलिहीत रहा
मनापासून आभार 💐
DeleteKhupacha chaan lihilat Dada...sagla prasang dolya Samor ubha rahila....aashecha lihit rahaa...
ReplyDeleteमनापासून आभार 💐
DeleteKhup chaan lihilat Dada....sagala prasang dolya samoor aala....aashecha lihit rahaa
ReplyDeleteमनापासून आभार 💐
DeleteFaar chan .. god bless you always.. lihit raha
ReplyDeleteमनापासून आभार 💐
DeleteKhup mast... Sgala with photos and videos... Mast... Lihit raha...
ReplyDeleteमनापासून आभार 💐
Deleteखूप छान अनुभव कथन 👌🏼
ReplyDeleteपायातल्या stepler पिना आणि हातातला खिळा घरी घेऊन आलेत भारीच 😀
मनापासून आभार 💐
Deleteकलियुगात परमेश्वर हा माणसांच्या रूपात संकटकाळी धाऊन येतो याचा अनुभव तुला आला आणि तो तु किती कृतज्ञतेने व्यक्तही केलास. बायको आणि सर्व कुटुंबिय यांचे प्रयत्न डॉक्टरांचे योग्य उपचार..सुहृदांच्या शुभेच्छा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेगजानन महाराजांचे आशीर्वाद... यामुळेच तु या अवघड प्रसंगातून सुखरूप बाहेर पडलास. काळजी घे.. महाराज आहेत सदैव बरोबर.
ReplyDeleteमनापासून आभार 💐
Deleteफार छान अनुभव लिहिलाय..पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी शुभेच्छा. लिखाण उत्तम..कुठेही अतिशयोक्ति नाही..👍
ReplyDeleteमनापासून आभार 💐
Deleteवाचताना सर्वे गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.. किती सोसावे अणि किती भोगावे... आपली काही चुकी नसताना.. खरच.. महाराज नक्कीच पाठीशी आहेत.. आपण कोणाचे वाईट केले नाही.. आपले कधीच वाईट होणार नाही.. सर्वांचे प्रेम.. आशिर्वाद अणि आत्मा विश्वास.. तूला काल प्रत्यक्ष भेटून जो आनंद झाला तो शब्दात नक्कीच लिहू शकत नाही.. या सर्व गोष्टीतून तू पूर्ण बरा होवून दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू करशील.. आम्ही तुझ्या स्पेशल डिशेस खाण्यासाठी आतुर आहोत.. खूप शुभेछा.. जय गजानन
ReplyDeleteमनापासून आभार 💐
Deleteखूपच सुंदर अनुभव कथन, Though the dish is tasteless, and unwanted, well decorated garnishing increased the appetite of reader...
ReplyDeleteKeep writing.Get well soon ....
सुंदर अनुभव लेखन , अशी दुर्दैवी घटना परत घडू नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना ! परंतु यातूनच या सुंदर लिखाणाची निर्मिती झाली . जे झाले त्यामागील सकारात्मकता (+ ve) लक्षात घेऊन ,मी सुंदर लिहू शकतो याचा आनंद मनी ठेऊन लिहीत रहा . 👍
ReplyDeleteपुढील लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
आरोग्यासाठी शुभेछा 💐💐💐💐💐💐
मनापासून आभार 💐
DeleteWell written, straight from the heart
ReplyDeleteYou are a fighter
मनापासून आभार 💐
Deleteकोणाच्या हि आयुष्यात असे दिवस येऊ नयेत ताईंनी झालेली घटना सांगीतली होती पण वाचताना सर्व गोष्टी समोर घडतात असे वाटले लवकर भरे होऊन तुम्ही तुमचे दैनंदिन जीवन पहिल्या सारखे जगावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना
ReplyDeleteमनापासून आभार 💐
Deleteतुझा चालतानाचा व्हीडिओ पाहून खूप आनंद झाला, परवाच आई ने विचारले अभिजित चालायला लागलो का 😆
ReplyDeleteलेखनाचा प्रयत्न उत्तम 👍
आणि तुला आधी सांगितले आहेच आम्हाला काय वाचायची इच्छा आहे ते 😍😀😀 त्या दृष्टीने नक्की लेखनाची सुरुवात कर
तुला खूप खूप शुभेच्छा 🌈💐
मनापासून आभार 💐
Deleteवा छानच लिहिलंय,आमच्या वृषालीचा नवरा शोभतोय!मस्त एन्जॉय केलंय दुखणं, एखादे सुंदर,नयनरम्य प्रवास वर्णन वाचतोय की काय असेच वाटत होते. सद्या आभासी हा शब्द खूप जोमात आहे,आभासी बैठक,आभासी वारी तसं तुमचे सगळं आजार पण आपण आभासी स्वरुपात अनुभवतोय,पाहतेय व सहभागी आहोत असेच वाटत होते वाचतांना. तसं साहित्यातील काना,मात्राही मला समजत नाही पण तुम्हीं लिहिलेलं खूप भावलं एव्हढे मात्र १००%.असेच लिहीत रहा पण त्यासाठी असे काही दिव्य पुनः करायची गरज नाही,कशावरही लिहा काहीही लिहा पण लिहीत रहा!तुमचे ते तार, खिळा, स्क्रू,स्टिक, कुबडी,वॉकर इत्यादींचे संग्रहालय पहायला नक्की येणार आहे.अच्छा, काळजी घ्यावी.~ ~पाटील काका
ReplyDeleteKhop Chan.... Take care... Think positive always.. :)
ReplyDeleteमनापासून आभार 💐
DeleteChhan lihile sir
ReplyDeleteमनापासून आभार 💐
Deleteखूप छान लिहिलंय.. 👍👍👍
ReplyDeleteअनुभव आधारित लेखन उत्तम झाले आहे. समोर घटना घडत आहे असे वाटले. तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी व पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteKhupach chhan lihilay.vachtana kuthehi Atishyokti nhi vatali.agadi ghadal tasach mandlat.
ReplyDelete