Thursday, September 23, 2021

स्टेटस


प्रत्यक्ष हाती संदेश, खलिते, नंतर कबुतर, पत्र-तार पासून ते मसेंजर, व्हाट्स अँप इतका प्रवास.... 


बबबबब... 😳


प्रत्येक गोष्टींवर कित्ती कित्ती लिहिता येईल ना..!✒️💗


पण आज एक वेगळीच गंमत...


आई म्हणते, 'देवाला खूप कंटाळा आला होता...😧😦😶


त्यावर उपाय म्हणून त्याने ही सृष्टी बनवली...


🌎🌜🌞🌻🐯🐒👨‍👩‍👦


यातील प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याचे खेळणे आहे...


🎊🎉🎁🎀🎈


त्याला तो चावी देतो, आणि नंतरच्या गमती बघत बसतो...


😅😇😎😭


त्यात त्याचे सगळ्यात आवडते खेळणे म्हणजे माणूस, 


कारण ते दिलेल्या चावीनुसार ९९% चालतच नाही...


म्हणूनच नवनवीन शोध लागतात, कधी उपयोगी असतात  ❤️💛💚💙💜


तर कधी विध्वंस करतात... मग बिचाऱ्या शाळेतल्या मुलांना निबंध लिहावे लागतात...


शाप की वरदान... 🙈🙉🙊


मुद्दा भरकटला जरासा... 😝


असाच काहीसा प्रवास, संदेश वहनाचा...


🐦...✉️...💌...📞...📱...


आज यातले बहुतांश प्रकार उपलब्ध आहेतच...


पण तंत्रज्ञानाचे अजून एक नव्याने दिलेली गंमत...😍


स्टेटस....    व्हाट्स अँप, फेसबुक, इंस्टा...


 

अशा एक ना अनेक सोशल साईट आहेत ज्यावर स्टेटस बघायला मिळतात...😎


कदाचित नित्य व्यवहाराचा  बनलेला अविभाज्य भाग...😉


काही जण हा क्षणोक्षणी अपडेट ठेवतात... (बदलणे किंवा त्यात भर टाकत रहाणे) 


जणू तसे न केल्यास खूप काहीतरी हरवून जाईल...😇


तर काही इतरांचे हे मूक संदेश बघण्याला आपले आद्य कर्तव्य किंवा अधिकार किंवा टाईम पास समजतात व ईमाने ईतबारे करत असतात...😅😂


आणि अनेक बिचाऱ्यांना इतक्या मोठया शोधाची अजून माहितीच नाही...😀


असो...😉    सांगायची गंमत वेगळीच... 


निवांत वेळी हे संदेश (स्टेटस) बघणे (कारण अनेकदा ढिगभर असतात) 


हा उत्तम आंनद, करमणूक होऊ शकते... 😍


माझ्यासाठी तरी... पूर्वी मी सलग सगळ्यांचे बघायचे...


मग नवे शिक्षण झाले..


याची इत्यंभूत माहिती मिळते, कोणी आणि अगदी किती वाजता बघितले..😏


मग अनेकांना राग येतो किंवा वाईट वाटते की बघूनही प्रतिसाद नाही... 😡😫


मग बघतात कशाला....इत्यादी😏


तेंव्हापासून ठराविक जणांचेच बघते, जमल्यास मनापासून प्रतिसादही देते.. 💛


त्यात आवडणे, प्रेम, कौतुक, काळजी अनेक भाव असतात, कधीतरी राग, हक्कही... 


एकदा घडलेला प्रसंग... 🖤


खूप जवळच्या दोन व्यक्ती, दर पाच मिनिटांनी स्वतःचे स्टेटस बदलत होते...


दोघांच्यात काहीतरी समान जाणवत होते...


मी मेसेज करुन विचारले, तर समजलं की हा भांडणाचा नवीन प्रकार आहे...


वाद झालेत, बोलणे बंद... म्हणून एकमेकांना जे सांगायचे ते स्टेटस वर ठेवत आहोत...🙄


 कप्पाळ माझे... दोघांना चांगले झापले...


म्हणलं हवा तितका अबोला राहू दे, पण दोघांमधल्या गोष्टी अशा सगळ्याना का खुल्या करता...


वयाने मोठी असल्यामुळे हक्काने सांगितले, त्यांनीही समंजसपणे, धोके लक्षात आल्याने ऐकले... 


तर असे अनेक अनुभव सांगता येतील...😰😱


पण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कोणताही अधिकार नसल्याने ते राहू दे...😷


मला सांगायला आवडेल... मी आणि माझा स्टेटस...😍


जितकं इंग्रजी शिकले, त्यावरून स्टेटस म्हणजे सोप्या शब्दात सद्यस्थिती...


वेगवेगळ्या सोशल अँपने दिलेली, ही सुविधा २४ तासासाठी मर्यादित असते... ⏰


यावर एकदा अपलोड केलेल्या गोष्टी अँप वर्षानुवर्षे साठवून ठेवते,


 व आपल्याला पुन्हा त्या तारखेला दाखवत रहाते... (fb, इंस्टा) 📹


हे फोटो, लेखन इतरांना अनेकप्रकारे कॉपी करता येते... 😜


तर असे त्याचे थोडे ज्ञान घेऊन...📚 मी काय करते...🙈


एखादी माहिती अनेकांना उपयुक्त आहे असे वाटल्यास, वैयक्तिक पाठवण्याऐवजी इथे अपडेट करते... 💗


माझ्या लेखनाच्या ब्लॉग लिंक इतरांचे आवडलेले लेखन किंवा त्या पोस्ट शेअर करते... ✒️


हा झाला सरळ, साधा आणि सोपा विषय...😲


पण मी इतकी साधी सरळ आहे कुठे, 😝😵‍💫


त्यामुळे मधूनच कधीतरी, असे स्टेटस अपडेट करायचे की मग बघणारे विचारतात... 


आज काय स्पेशल...?  वाढदिवस / कार्यक्रम ....?


मग उगाच भाव खात सांगायचे, नाही सहजच 😉🤣😝🙈


स्पेशली खूप निवांत असताना, धावपळ-गडबड-वैताग असल्याचे दाखवायचे...


आनंदात असताना, उगाच प्रश्न-समस्या-दुःख असल्याचे...😑😬


एकदा यावरुन ओरडा पण खाल्ला आहे, की इतके रिकामे उद्योग करायची गरज आहे का....? 


खरं बघायला गेलं तर नक्कीच नाही... 


पण ज्यानी हा इतका सुंदर शोध लावला, की तुम्ही आज काय करत आहात, काही प्रश्न आहे का, काही कौतुक-आनंद व्हावा असे आहे...?


तर असं सगळं आपल्या जवळच्या, प्रेमाच्या प्रत्येकाला वैयक्तिक पाठवायची गरज नाही... 


स्टेटसला ठेवा, आपोआप कळेल सगळ्यांना...


यामुळे आपला आणि त्यांचा जास्तीचा डाटाही वापरावा लागत नाही, मेमरी ब्लॉक होत नाही...


इतरांनी पण जरुर बघावे, त्यावर बोलावेसे, विचारावेसे वाटले तर त्याचेही स्वागतच...😍


काहीच म्हणणे नाही, त्याविषयी पण तक्रार नाही....


पण... पण.. मोठ्ठा ... पण 😎


काहींना स्टेटस बघून नंतर त्यावर भलत्याच कोणाशी तरी चर्चा, थोडक्यात गॉसिप करण्यात आनंद वाटतो...


जणू खूप मोठी जबाबदारी पार पाडत आहोत, असा अविर्भाव...


ती काळजी, चिंता आपल्याला सोडून इतर सगळ्यांना सांगत फिरणार...


मग अशांना थोडा त्रास द्यायला, गोंधळात टाकायला काय हरकत...?


😇😌😉



आणि हो हा सगळा लेखन प्रपंच उगाच बरं...


यातून कुणालाही वैयक्तिक काही म्हणायचे नाही, किंवा सुचवायचेही नाही... 😇


 मी फक्त माझी निरीक्षण सांगितली इतकंच... 


माझ्या जवळच्या, प्रेमाच्या, मायेच्या, कौतुकाच्या सगळ्यांना आग्रहाची विनंती...


सहज लिहिलंय, सहज वाचा आणि सोडून द्या... 


माझे स्टेटस आणि त्यावरचा तुमचा प्रतिसाद आहे तसाच राहू दे, त्यात काहीच बदल अपेक्षित नाही...


कारण तुम्ही आहेत तसेच मला आपलेसे वाटता...😉


त्यासोबत दुसरं म्हणजे, तुमच्या स्टेटस ज्ञानात नवीन भर पडली असेल,


आणि त्यात बदल करायचे असेल तर त्यावर काहीच हरकत नाही...


अशी ही या मनीचे त्या मनी... पोहचवणाऱ्या नवीन संदेश वहनाची कथा उरकते... 😬


आणि जरा सगळ्यांच्या स्टेटस फेरी करायला जाते...😀💓


******************************************

7 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. स्टेटस..... ज्ञानात गमतीशीर भर पडली.नेहमी प्रमाणे तुझे लेखन वाचून मस्त वाटले.

    ReplyDelete
  3. Aaplishe vatli post...mast...status check

    ReplyDelete

suggestions most wlcome