Tuesday, October 05, 2021

पितृपक्ष


नाही... नाही... मला  हे पटतच नाही...!


का करावे हे सारे...प्रथा, परंपरा, पद्धती...?


संस्कार, असे असतात...?


आज माझ्यासोबत फक्त शरीराने नसणाऱ्यांनी...


काय म्हणतात, ते दिवस, तिथीनुसारच यावे आणि ते भाताचे गोळे उष्टवावे...


नाही पटत मला हे...


एक तर जे या मायरुपी जाळयातून सुटले आहेत, त्यांनी येऊच नये...


आणि यायचेच तर कधीही यावे... कोणत्याही रुपात यावे...


त्यांच्या अनेक आवडत्या गोष्टी राहिल्या असतील, त्या करण्यास यावे...


आवडते पदार्थ चाखावे...असे खूप तत्वज्ञान मी नेहमीच पाजळत असते...


आहेत किंवा होती अशी माझी मतं...


पण मी २००२ साली आई, बाबा, आजीसोबत काशी, गया, प्रयाग त्रिस्थळी अनुभवली होती...


तिथे माझ्या या मतांवर पुन्हा विचार करावासा वाटला...


तीनही जागा पर्यटन, वारसा, प्रथा परंपरा यासाठी नितांत सुंदर...


तिथले अनेक अनुभव स्वतः घेतल्याशिवाय खरे वाटत नाहीत...


तिन्ही ठिकाणी श्राद्धविधी करतात...


हे फक्त आपल्या पूर्वजांचे नाही, तर निसर्गाच्या सर्व जीवमात्रांचे असते...


आणि त्यात त्यांनी आपल्याला त्रास न देणे, असा हेतू नसून...


त्यांच्या अस्तित्वाचा आदर...


या संसारातून पूर्ण मुक्तता...


पुढील प्रवासास शुभेच्छा हे भाव असतात...


तिथे एकदा हा श्राद्धविधी केला की पुन्हा परत कोठेही करु असे ते गुरुजी सांगतात...


पण तरी...


जसे रोज, कुणीतरी जन्मास येते...


तसे, कुणीतरी मृत्यही पावते...


त्याही सगळ्यांचा आदर, स्वीकार आणि त्यांचा इथला प्रवास संपवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी हे दिवस, या प्रथा, परंपरा...


त्यातले सोपस्कार मला कदाचित जमतील किंवा नाही जमणार...


पण हो, सर्वपित्री अमावस्येला...


हात जोडून अतिशय नम्रपणे माझ्या सहृद भावना, मी नक्कीच व्यक्त करते आणि करत राहीन...




*****************************************


7 comments:

  1. वा छान च लिहिले आहे
    नेहमीप्रमाने
    पटल मला

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

suggestions most wlcome