बाल विठ्ठल भक्त
सावळ्या हरीला, कळू द्या तरी की,
काय झालं रुसायला, रखुमाई रुसली
कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला,
चला जाऊ पुसायला,
अहो मी काही गाणं म्हणत
नाहीये, खरोखरच रुसली आहे हो, आपुली रखुमाई...
म्हणून तिला विचारते आहे, की आई अगं का रुसली आहेस...
तुम्ही येता का माझ्या
मदतीला...? हो ना, मग या लवकर...
आता काय झालं...? मंदिर तर बंद जायचं
कुठे...?
अहो, रखुमाई रुसून इथेच आहे बसलेली...
या तुम्ही, आपण मिळून तिला साकडं घालू...
तिचा रुसवा दूर करू...
आई, रखुमाई तुला आमचा साष्टांग नमस्कार...!
तू अशी का रुसली आहेस...
आम्हा छोट्या भक्तांवर का रागावली आहेस..
अगं काय म्हणतेस तरी
काय...?
तू आमच्यावर नाही, तर मोठ्या माणसांवर रागावली आहेस...!
आणि ते का म्हणे ... ? काय केले त्यांनी...?
काय म्हणतेस.... त्यांना
विठोबाची काळजीच नाही... वारीची परवानगी द्या... वारीच्या परवानगी द्या असे म्हणून
विठ्ठालाची कामे ते वाढवत आहेत...
आई म्हणजे ग काय ...
आम्ही समजलो नाही ...?
कायs s s सांगतेस तरी काय...?
वारी करुन पंढरीला
आलेल्या भक्तांना विठोबा भेटणारच नाही...
का गं, तो ही रुसला आहे की रागावला आहे...?
नाही ना... मग ...मग का
नाही भेटणार?
अग सांगते तरी काय...? फक्त विठोबाच नाही, तर कुठलाच देवबाप्पा सध्या कोणत्याच मंदिरात
नाही...
मग कुठे गेले आहेत
सगळे...?
खरंच की माझ्या तर हे
लक्षातच आले नाही...की
सध्या सगळे देव करोना
नावाच्या व्हायरस राक्षसाला संपवून टाकण्यासाठी डॉक्टर , पोलीस, सफाई कामगार आणि असे चांगले काम करणाऱ्या सगळ्यांच्या
मदतीला गेले आहेत... म्हणूनच तर सगळी मंदिरे बंद आहेत... जसे आपण घरातून बाहेर
जाताना घर बंद करून कुलूप जाऊन जातो अगदी तसंच .... हो ना...!
आई, रखुमाई तू काळजीही नको करू, आणि आमच्यावर रुसूही नको ?
काय म्हणालीस, मी चिमुरडी, मी करणार तरी काय...?
आता तू गंमत बघ...
तर, मंडळी तुम्ही तर ऐकलेच आहे आत्ता रुखुमाईने काय
सांगितले ते...
तिला फक्त विठोबाची नाही
तर सगळ्याच देवांची काळजी वाटते आहे...
देव मंदिरात नाही, देव नाही मंदिरात...करोनाशी लढायला, सारे लागले कामाला
कुणी डॉक्टरांच्या,कुणी पोलिसांच्या, तर कुणी सफाई कामगारांच्या गेले आहेत मदतीला...
थोडक्यात काय, तर मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे म्हणून , तिथे जाऊन गर्दी करून, आपण करोना वाढवून त्यांची कामे वाढवून त्यांना त्रास
द्यायचा नाही...त्यांचे चांगले विचार घरात बसून समजून घ्यायचे... आणि उत्तम माणूस बनायचे...
राहील ना लक्षात, या
बालभक्ताची विनंती...?
हेच मी, माझ्या मित्र मैत्रिणींना व्हिडीओ कॉल करून
सांगते...
आपण नंतर भेटू...
छान रहा,काळजी घ्या, मास्क घाला...
कमीत कमी घराबाहेर पडा
आणि गर्दी टाळा...

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome