Saturday, May 09, 2020

मी आणि ती




ती चिमुकली, तरी धिटुकली..🐥

सरळ घरात येते म्हणजे काय..?

माझा पवित्रा अजिबात चालणार नाही म्हणून..😟😏

ती न रागावता खिडकीचा कोपरा निवडते..🕊️

तरी माझी चरफडच..🤥

तुला काय फरक पडणार..?😠😡

निस्तरावे तर मला लागणार.. 🤨

रोज कचरा होणार..

तो साफ करावा लागणार..🍂🍂

मग चिमुकला किलबिलाट चालू होणार..🐣🐣🐣

त्यात मी गुरफटून जाणार..💞💗

आणि अचानक कधीतरी एक दिवस सगळं, सूनं सूनं करत, तू सहज निघून जाणार...😞😓

मी मात्र यात गुंतून पडणार ..💓

नाही..❌ अजिबात नाही.. ❌❌

नकोच..❤️‍🔥❤‍🩹

मी तिला हुसकावून लावायला बघते, तिने कष्टपूर्वक जमविलेले सारे काढून फेकून देते...😶‍🌫

आणि ती..!

ती मात्र काही मनावर न घेता, आपल्याच उद्योगात मग्न..🤎

पुन्हा एकेक करुन जमवाजमव सुरुच..

ना आरडाओरडा, ना माझ्यावर राग, ना दुःख..😳😱

मी वैतागून तिच्याशी भांडण करते..

इतकी गं कशी तू निगरगट्ट..?

नाही, नको कळतच नाही तुला..

असे म्हणत, तिला पुन्हा हुसकावून लावणार तर..

इतक्यात..

माझ्या शेजारची राहणारी चिमुरडी..👧🏻 

कसला तरी पसारा मांडून, फुरगटून बसलेली..😫

आता हिला काय झाले..?🤔

विचारले तर म्हणते कशी..👧🏻

"अग्गsss माऊ, तुझ्या खिडकीत किनईssss 

एक क्युट बर्डी नेस्ट बनवते आहे..

खूप लांब उडत जाऊन, ती ग्रास आणते..

सी, सी.. हियर, मी तिच्यासाठी काय काय ठेवले इथे..

वाळलेले ग्रास, कॉटन, क्लॉथ  तुकडे..पण ती वाईईईट्ट..

यातले तर काहीसुद्धा घेत नाही.."

 👧🏻 बांध फुटून एकदम मुसमुसू लागते..😭

मी तिची समजूत घालायला, तिला जवळ घेते..🤗

पण काय बोलावे सुचतच नाही..❤‍🩹

विचार करु पाहते, तर पुरता गोंधळ..🤯प्रश्नांचा कोलाहल होतो..😥

खूप काहीतरी दाटून येते..😔😞

वाटतं, किती बरं झालं असत नाही..

मलाही या चिमुकल्या, धिटुकली सारखं होता आलं तर..❣️

आपले काहीही, कुणीही मोडले, तरी त्याची तक्रार नाही..❤‍🔥

उलट न रागावता पुन्हा नवी सुरुवात..💓

सारखे सारखे तेच 💔💔 घडले तरी निराशा नाही..

मीच, मलाच याचा त्रागा नाही, की अभिमान नाही..🤍💛

आणि आयते मिळाले, तरी त्याचीही हाव नाही.. 🧡

आपल्या वाट्याचा भार उचलण्याची पूर्ण तयारी..💙

आणि तीही अगदी सहज.. 🤍

त्याचे ना उत्सव, ना गुणगान..🤎❤️

मी काय, कुणाला समजवणार..?😶

मी तर माझ्यातच हरवलेली.. 🙄

आनंदाचे उत्सव करणारी.. 🥳

नाहीतर सतत वैतागणारी..🥵

इतकसं काही होता, कोलमडून जाणारी..😟

फक्त आणि फक्त..

मी-मला-माझे यातच पुरती अडकून गेलेली..😫😩

अजिबात योग्य नाही हे.. मी स्वतःला सांगते..!

सारे विसरुन तशीच त्या धिटुकल्या चिमुकलीकडे,

अनिमिष नजरेने बघत, कुशीतल्या निरागसतेला कुरुवाळत राहते..💗

मनोमन प्रार्थना करते, मला ह्या दोघींसारखे बनव..🙏🏻🙏🏻🙏🏻

आणि मिठीमधल्या या निरागस, निष्पाप जीवाला..

असेच जप..👧🏻

वयाने कितीही मोठी झाली, तरी तिच्या भावनांना असेच बालमन लाभू दे..🤎

इतरांना जपणारे, सहज प्रेमात पडणारे.. 💛

💓..तेही निरपेक्ष ..💓

*********************************

10 comments:

suggestions most wlcome