
सुश्रुता :- काय मित्रांनो ओळखलत का आम्हाला? अहो आम्ही तुमच्या मैत्रिणी मी सुश्रुता आणि ही दूर्वा ही गार्गी ही निषाद आम्ही कधीच्या कौशिकीला शोधतो आहे. तुम्ही पहिले का तिला? कौशिकी ए कौशिकी अग ए कौ.....
कौशिकी :- अग हो हो हो .... काय झालं तरी काय? का इतक्या हाका मारते आहेस?
दूर्वा :- काय म्हणजे काय ? बागेत जायचं ठरल होत ना काल. विसरल्या वाटत बाईसाहेब.
सुश्रुता :- असच असत बाई तुझं. चल अवर आता पटकन नाहीतर झोके मिळणार नाहीत.
कौशिकी :- नाही मला जमणार नाही आज आणि हो तुम्हीपण जाऊ नका. उलट माझी मदत करायला या. खूप तयारी करायची बाकी आहे.
गार्गी :- तयारी आणि ती कसली ?
कौशिकी :- वाढदिवसाची.
सुश्रुता :- कुणाचा ? तुझा तर मागच्याच महिन्यात झाला की.
कौशिकी :- अग ती तर गंमतच आहे. आज किनई माझ्या बाहुलीचा....सोनुलीचा वाढदिवस करणार आहे.
निषाद :- बाहुलीचा वाढदिवस ?(जोराने हसू लागतो मग सगळेच हसतात) तुझं नेहमीच काहीतरी वेगळ चालू असत बाबा. असं काही कोणी करत का?
कौशिकी :- (चिडून) का रे ? वाढदिवस तुझा असतो.... माझा असतो....... सगळ्या मित्रमैत्रिणीचा असतो.....आईबाबा काका मावशी आजीआजोबा सगळ्यांचा असतो मग माझ्या सोनुलीचा केला तर काय बिघडलं? तुला नसेल यायचं तर नको येऊ.
निषाद :- चुकल माझ. sorry. रागवू नको. मी पण येणार आणि आम्ही तुला मदत पण करतो काय करायचं सांग.
कौशिकी :- तसं काम सगळ झालं आहे फक्त आपल्या बाकी मित्रांना सांगायचं राहील आहे. ते सांगा आणि आवरून या लवकर मी पण आवरते.
गार्गी :- अजून कोण कोण येणार आहे?
कौशिकी :- आपले सगळे मित्रमैत्रिणी, आणि माझी आजी आली आहे ना गावावरून मामा-मामी त्यंचा,गंधारदादा ,मावशी- काका त्यांची नभा आणि आईबाबा हे पण सगळे आहेत.
(सगळ्यांचा आवाज ऐकून घरातून आई, बाबा, आजी, आजोबा, मावशी, काका, गंधार, नभा सगळेच बाहेर येतात)
सुश्रुता :- बापरे इतके सगळेजण. पण एकदम धमाल येणार मग. केक,मेणबत्ती, पार्टी मस्त दंगा करु.
गंधार :- ए आज केक नाही बर का? खर तर माझी मावशी खूप छान केक करते पण वाढदिवसाला केक कापायचा नाही असं आमच्या शाळेतल्या ताईंनी सांगितले आहे. त्यामुळे आज no cake.
नभा :- आणि ताईंनी हे पण सांगितले आहे की वाढदिवस म्हणजे वाढण्याचा दिवस, मोठे होण्याचा दिवस मग तो दिवा विझवून कसा करता येणार? त्यामुळे मेणबत्ती नाही.
दूर्वा :- केक नाही, मेणबत्ती नाही मग करायचं तरी काय?
मावशी :- अग छान औक्षण करायचं, श्लोक म्हणायचे , ज्यांना गाणी येतात त्यांनी गाणी म्हणायची.
गार्गी :- माझी आई करते औक्षण. पण का करतात ते. त्यानी काय होत.
आजी :- मी सांगते का करायचं ते पण ते कसं करतात हे माहिती आहे का कुणाला? ज्याला माहिती आहे त्यने ते सांगा मी आणि आजोबा तसे का ते सांगतो.
गंधार :- मी पहिला.. आधी छान कुंकवाचा तिलक लावते.
आजी :- अगदी बरोबर...ते कपाळावरील बुद्धी चक्राला चालना मिळावी म्हणून.
नभा :- ए आणि त्यावर अक्षता लावून थोड्या डोक्यावर पण टाकते.
आजोबा :- छान निरीक्षण. ते अक्षत म्हणजे नेहमी चांगले वागा हे सांगण्यासाठी.
सुश्रुता :- मला पण माहिती आहे, मग सुपारीने ओवाळते.
मामा :- हे मी सांगतो. ते आपण सुपारीप्रमाणे टणक व्हावे.. सारखे आजारी पडू नये यासाठी. त्या करता सगळ खायला हवे, थोडा व्यायामही करायला हवा,मैदानावर बागेत खेळायला हवे बर का. बरोबर ना आई?
आजी :- अगदी बरोबर. ही सगळी शहाणी मुले आहेत. हे सगळ करतात.
दूर्वा :- हो ग आजी. आणि हो ओवाळताना आई सोन्याची अंगठी पण घेते.
आजोबा :- ते सोन्यासारखे यश मिळावे, कीर्ती दूर वर व्हावी यासाठी.
कौशिकी :- सगळ झाल्यावर मग तेलाच्या दिव्याने ओवाळते.
आजी :- ते तेलाच्या स्निग्धतेसारखे सगळ्यांशी प्रेमाने वागाव. खूप मित्र मिळावे म्हणून.
मामी :- आणि दिव्यात जी वात असते कापसाची. त्या कापसासारखे केस पांढरे होईपर्यंत आयुष्य मिळावे म्हणून.कळल का बच्चा पार्टी?
सगळे :- हो मस्त समजल. यातल काहीच माहित नव्हत आम्हाला.
आजी :- मग तर छानच झालं. पण आज तुम्हाला सोनुलीचा वाढदिवस करायचा आहे ना? मग आवरा आता नाहीतर उशीर होईल.
कौशिकी :- हो.... हो आवरतो लगेच तुम्हीपण सगळे आवरून या. पण कोणीही काहीही गिफ्ट आणायचं नाही बर का. तेही ठरलं आहे आमचं.
सुश्रुता :-गिफ्ट नाही पण काल ताईंनी शिकवलेले पेपर डिशचे पपेट बनवून आणते. सोनुलीला चालेल ना?
निषाद :- मी छान ग्रिटिंग बनवतो.
दूर्वा :- मी मस्त चित्र रंगवून आणते.
नभा :- मी सुदिनमं सुदिनमं श्लोक आणि तुम जियो हजारो साल हे गाण म्हणेल मला पूर्ण पाठ आहे.
गंधार :- मी तर मस्त बासरी वाजवून दाखवेल.
कौशिकी :- हो हे सगळ चालेल आणि आवडेल पण माझ्या सोनुलीला. नुसती फुंकर मारून मेणबत्ती विझवायची आणि केक कापायचा त्यापेक्षा हे कसलं भारी आहे. आता यापुढे माझाही नाही सगळयाचा वाढदिवस असाच करायचा.
सगळे :- हो...हो आम्हीपण आईबाबाना सांगणार आमचाही असाच करायला.
बाबा :- तुम्ही आवरा सगळे तो पर्यंत मी राहिलेलं थोड डेकोरेशन करुन घेतो.
आई :- आणि मी खाऊच्या डिश तयार ठेवते.
(सगळे जातात. लवकरच आवरून परत येतात आणि छान थाटामाटात औक्षण करुन, श्लोक म्हणून, गाणी म्हणून उत्साहात सोनुलीचा वाढदिवस करतात.)
****************************************

















एकदम छान गोष्टीतून सर्व महत्व सांगितले आहे.. यातून खूप जणांना नक्की बोध होईल.. आपल्या संस्कृतीचे अणि सणांचे असेच सर्वांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे
ReplyDeleteमनःपूर्वक आभार
DeleteKhup chan👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक आभार
Deleteमनःपूर्वक आभार
ReplyDeleteअगदी सहजसोप्या शब्दांत छान मांडले आहे. मुलांना लगेच समजेल.
ReplyDeleteखूप छान.
ReplyDelete