Monday, May 03, 2021

औक्षण



सुश्रुता :- काय मित्रांनो ओळखलत का आम्हालाअहो आम्ही तुमच्या मैत्रिणी मी सुश्रुता आणि ही दूर्वा ही गार्गी ही निषाद आम्ही कधीच्या कौशिकीला शोधतो आहे. तुम्ही पहिले का तिलाकौशिकी ए कौशिकी अग ए कौ.....

कौशिकी :- अग हो हो हो .... काय झालं तरी कायका इतक्या हाका मारते आहेस?

दूर्वा :- काय म्हणजे काय बागेत जायचं ठरल होत ना काल. विसरल्या वाटत बाईसाहेब.

सुश्रुता :- असच असत बाई तुझं. चल अवर आता पटकन नाहीतर झोके मिळणार नाहीत.

कौशिकी :- नाही मला जमणार नाही आज आणि हो तुम्हीपण जाऊ नका. उलट माझी मदत करायला या. खूप तयारी करायची बाकी आहे.

गार्गी :- तयारी आणि ती कसली ?

कौशिकी :- वाढदिवसाची.

सुश्रुता :- कुणाचा तुझा तर मागच्याच महिन्यात झाला की.

कौशिकी :- अग ती तर गंमतच आहे. आज किनई माझ्या बाहुलीचा....सोनुलीचा वाढदिवस करणार आहे.

निषाद :- बाहुलीचा वाढदिवस ?(जोराने हसू लागतो मग सगळेच हसतात) तुझं नेहमीच काहीतरी वेगळ चालू असत बाबा. असं काही कोणी करत का?

कौशिकी :- (चिडून)  का रे वाढदिवस तुझा असतो.... माझा असतो....... सगळ्या मित्रमैत्रिणीचा असतो.....आईबाबा काका मावशी आजीआजोबा सगळ्यांचा असतो मग माझ्या सोनुलीचा केला तर काय बिघडलंतुला नसेल यायचं तर नको येऊ.

निषाद :- चुकल माझ. sorryरागवू नको. मी पण येणार आणि आम्ही तुला मदत पण करतो काय करायचं सांग.

कौशिकी :- तसं काम सगळ झालं आहे फक्त आपल्या बाकी मित्रांना सांगायचं राहील आहे. ते सांगा आणि आवरून या लवकर मी पण आवरते.

गार्गी :- अजून कोण कोण येणार आहे?

कौशिकी :- आपले सगळे मित्रमैत्रिणीआणि माझी आजी आली आहे ना गावावरून मामा-मामी त्यंचा,गंधारदादा ,मावशी- काका त्यांची नभा आणि आईबाबा हे पण सगळे आहेत.

(सगळ्यांचा आवाज ऐकून घरातून आईबाबाआजीआजोबामावशीकाकागंधारनभा सगळेच बाहेर येतात)

सुश्रुता :- बापरे इतके सगळेजण. पण एकदम धमाल येणार मग. केक,मेणबत्तीपार्टी मस्त दंगा करु.

गंधार :- ए आज केक नाही बर काखर तर माझी मावशी खूप छान केक करते पण वाढदिवसाला केक कापायचा नाही असं आमच्या शाळेतल्या ताईंनी सांगितले आहे. त्यामुळे आज no cake.

नभा :- आणि ताईंनी हे पण सांगितले आहे की वाढदिवस म्हणजे वाढण्याचा दिवसमोठे होण्याचा दिवस मग तो दिवा विझवून कसा करता येणारत्यामुळे मेणबत्ती नाही.

दूर्वा :- केक नाहीमेणबत्ती नाही मग करायचं तरी काय?


मावशी :- अग छान औक्षण करायचंश्लोक म्हणायचे ज्यांना गाणी येतात त्यांनी गाणी म्हणायची.

गार्गी :- माझी आई करते औक्षण. पण का करतात ते. त्यानी काय होत.

आजी :- मी सांगते का करायचं ते पण ते कसं करतात हे माहिती आहे का कुणालाज्याला माहिती आहे त्यने ते सांगा मी आणि आजोबा तसे का ते सांगतो.

गंधार :- मी पहिला.. आधी छान कुंकवाचा तिलक लावते.



आजी :- अगदी बरोबर...ते कपाळावरील बुद्धी चक्राला चालना मिळावी म्हणून.

नभा :- ए आणि त्यावर अक्षता लावून थोड्या डोक्यावर पण टाकते.
आजोबा :- छान निरीक्षण. ते अक्षत म्हणजे नेहमी चांगले वागा हे सांगण्यासाठी.

सुश्रुता :- मला पण माहिती आहेमग सुपारीने ओवाळते.


मामा :- हे मी सांगतो. ते आपण सुपारीप्रमाणे टणक व्हावे.. सारखे आजारी पडू नये यासाठी. त्या करता सगळ खायला हवेथोडा व्यायामही करायला हवा,मैदानावर बागेत खेळायला हवे बर का. बरोबर ना आई?

आजी :- अगदी बरोबर. ही सगळी शहाणी मुले आहेत. हे सगळ करतात.

दूर्वा :- हो ग आजी. आणि हो ओवाळताना आई सोन्याची अंगठी पण घेते.

आजोबा :- ते सोन्यासारखे यश मिळावेकीर्ती दूर वर व्हावी यासाठी.

कौशिकी :- सगळ झाल्यावर मग तेलाच्या दिव्याने ओवाळते.



आजी :- ते तेलाच्या स्निग्धतेसारखे सगळ्यांशी प्रेमाने वागाव. खूप मित्र मिळावे म्हणून.


मामी :- आणि दिव्यात जी वात असते कापसाची. त्या कापसासारखे केस पांढरे होईपर्यंत आयुष्य मिळावे म्हणून.कळल का बच्चा पार्टी?

सगळे :- हो मस्त समजल. यातल काहीच माहित नव्हत आम्हाला.

आजी :- मग तर छानच झालं. पण आज तुम्हाला सोनुलीचा वाढदिवस करायचा आहे नामग आवरा आता नाहीतर उशीर होईल.

कौशिकी :- हो.... हो आवरतो लगेच तुम्हीपण सगळे आवरून या. पण कोणीही काहीही गिफ्ट आणायचं नाही बर का. तेही ठरलं आहे आमचं.

सुश्रुता :-गिफ्ट नाही पण काल ताईंनी शिकवलेले पेपर डिशचे पपेट बनवून आणते. सोनुलीला चालेल ना?

निषाद :- मी छान ग्रिटिंग बनवतो.

दूर्वा :- मी मस्त चित्र रंगवून आणते.

नभा :- मी सुदिनमं सुदिनमं श्लोक आणि तुम जियो हजारो साल हे गाण म्हणेल मला पूर्ण पाठ आहे.

गंधार :- मी तर मस्त बासरी वाजवून दाखवेल.

कौशिकी :- हो हे सगळ चालेल आणि आवडेल पण माझ्या सोनुलीला. नुसती फुंकर मारून मेणबत्ती विझवायची आणि केक कापायचा त्यापेक्षा हे कसलं भारी आहे. आता यापुढे माझाही नाही सगळयाचा वाढदिवस असाच करायचा.

सगळे :- हो...हो आम्हीपण आईबाबाना सांगणार आमचाही असाच करायला.

बाबा :- तुम्ही आवरा सगळे तो पर्यंत मी राहिलेलं थोड डेकोरेशन करुन घेतो.

आई :- आणि मी खाऊच्या डिश तयार ठेवते.

(सगळे जातात. लवकरच आवरून परत येतात आणि छान थाटामाटात औक्षण करुनश्लोक म्हणूनगाणी म्हणून उत्साहात सोनुलीचा वाढदिवस करतात.)  



 


****************************************

7 comments:

  1. एकदम छान गोष्टीतून सर्व महत्व सांगितले आहे.. यातून खूप जणांना नक्की बोध होईल.. आपल्या संस्कृतीचे अणि सणांचे असेच सर्वांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे

    ReplyDelete
  2. अगदी सहजसोप्या शब्दांत छान मांडले आहे. मुलांना लगेच समजेल.

    ReplyDelete

suggestions most wlcome